एरंडोल :प्रतिनिधी
येथे क्षत्रीय अहिर शिंपी समाजातर्फे संत शिरोमणी नामदेव महाराजांची 672 वी पुण्यतिथी मंगळवारी 26 जुलै 2022 रोजी उत्साहात साजरी करण्यात आली नामदेव महाराज मंदिरात विठ्ठल रूखमाई व नामदेव महाराजांच्या मुर्त्यांच्या पुजेसह अभिषेक गणेश लोटन सोनवणे व अनिता गणेश सोनवणे या दांपत्यांच्या हस्ते करण्यात राजेंद्र सोनवणे यांच्या हस्ते सहपत्नीक पालखी पूजन करण्यात आले यावेळी शहरातून मोटरसायकल रॅली व पालखी मिरवणूक वाजत गाजत काढण्यात आली शिंपी समाजाचे जिल्हाध्यक्ष बंडू शिंपी यांनी यावेळी भेट देऊन समाज बांधवांना शुभेच्छा दिल्यात पालखी मिरवणूकी नंतर नामदेव महाराज मंदिरात अतुल जगताप व नीलिमा जगताप या दांपत्याच्या हस्ते महाआरतीच्या कार्यक्रम पार पडला
पालखी मिरवणूकीच्या प्ररभी समाजाचे जिल्हा युवक अध्यक्ष तुषार शिंपी व सचिव निलेश जगताप यांच्या हस्ते नामदेव महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या कार्यक्रमांमध्ये शिंपी समाज अध्यक्ष संजय ईसई सुपडू शिंपी शरदचंद्र जगताप तुषार सोनवणे नरेंद्र ईसई माधव जगताप सुनील जगताप योगेश शिंपी संदीप शिंपी दीपक शिंपी ऋषिकेश शिंपी अमोल शिंपी राजू शिंपी दिलीप पवार सोनू शिंपी शुभम सोनवणे भैय्या सोनवणे गोपाल जगताप आदी समाज बांधव सहभागी झाले
