जळगाव मिरर | ३० डिसेंबर २०२५
जळगाव महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहोचली असून मंगळवार (दि. ३० डिसेंबर २०२५) रोजी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मोठी गर्दी पाहायला मिळाली. अनेक इच्छुकांनी आपले नामनिर्देशन अर्ज दाखल केले. याच दरम्यान प्रभाग क्रमांक १ मधून चेतन सुरेश महाले यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
प्रभाग क्रमांक १ मधील नागरिकांच्या सक्रिय पाठिंब्यावर चेतन महाले यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. स्थानिक प्रश्नांची जाण, नागरिकांच्या अडचणी आणि विकासाभिमुख दृष्टिकोन या मुद्द्यांवर ते प्रचारात उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रभागातील मूलभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि युवकांसाठी संधी निर्माण करणे हा त्यांच्या प्रचाराचा मुख्य अजेंडा असणार आहे.
यंदाच्या महापालिका निवडणुकीत चेतन महाले यांनी विकासाचे स्पष्ट व्हिजन डोळ्यासमोर ठेवून प्रचाराची तयारी केली असून, नागरिकांच्या विश्वासावरच विजयाचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक १ मधील निवडणूक लढत अधिक रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





















