• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

उपमुख्यमंत्रीपदासाठी सुनेत्रा पवार आघाडीवर; उद्या होणार अंतिम निर्णय !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 30, 2026
in राज्य, ब्रेकिंग, राजकीय, सामाजिक
0
उपमुख्यमंत्रीपदासाठी सुनेत्रा पवार आघाडीवर; उद्या होणार अंतिम निर्णय !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३० जानेवारी २०२६

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून, ती तातडीने भरून काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री पदासह अजित पवारांकडे असलेल्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या कोणाकडे सोपवायच्या, यावर पक्षांतर्गत चर्चा सुरू असतानाच सुनेत्रा पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाबाबत स्पष्ट संकेत दिले आहेत. शासन आणि पक्षाचे काम थांबून चालणार नाही, असे सांगत उपमुख्यमंत्री पदाची जागा तातडीने भरली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. “शो मस्ट गो ऑन” या उक्तीचा उल्लेख करत भुजबळ यांनी प्रशासनाची घडी विस्कटू नये, यासाठी त्वरित निर्णय आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.

अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण पक्ष हादरून गेला असला, तरी शासनाची जबाबदारी पुढे नेणे गरजेचे आहे, असे भुजबळ म्हणाले. सुनेत्रा पवार यांच्याकडे ही जबाबदारी सोपवावी, असे अनेक आमदारांचे मत असून ते योग्यच वाटते, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, शनिवार, ३१ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांची मुंबईत महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत विधीमंडळ पक्षनेत्याची निवड केली जाणार असून, सुनेत्रा पवार यांच्या नावावर एकमत झाले तर त्याच दिवशी उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी पार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या पार्श्वभूमीवर गुरुवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्याआधी बारामती येथे जाऊन सुनेत्रा पवार यांच्याशीही चर्चा करण्यात आली होती. प्रशासकीय कामकाजात कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी महत्त्वाच्या खात्यांचे वाटप लवकर करण्यावर भर दिला जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, केवळ उपमुख्यमंत्री पदापुरतेच नव्हे तर पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरही बदल होण्याची शक्यता आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद, तर प्रफुल्ल पटेल यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी देण्याचा प्रस्तावही चर्चेत असल्याचे समजते. अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्र अजूनही शोकसागरात असतानाच, प्रशासन आणि राजकीय स्थैर्य राखण्यासाठी हे निर्णय घेतले जात आहेत. आता सर्वांचे लक्ष शनिवारी होणाऱ्या आमदारांच्या बैठकीकडे लागले असून, त्यातून राज्याला नवे उपमुख्यमंत्री मिळणार का, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष केंद्रित झाले आहे.

Related Posts

पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव
जळगाव

पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव

September 9, 2026
विद्यार्थ्यांच्या भाषण, कविता अन् सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला शिक्षक दिन!
जळगाव

विद्यार्थ्यांच्या भाषण, कविता अन् सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला शिक्षक दिन!

September 5, 2026
पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मितीद्वारे विद्यार्थिनींमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव
जळगाव

पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मितीद्वारे विद्यार्थिनींमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव

September 5, 2026
भुसावळच्या राजकारणाला मोठा धक्का; प्रहारच्या अनिल चौधरींसह नगराध्यक्षा गायत्री भंगाळे शिवसेनेत!
जळगाव

भुसावळच्या राजकारणाला मोठा धक्का; प्रहारच्या अनिल चौधरींसह नगराध्यक्षा गायत्री भंगाळे शिवसेनेत!

September 3, 2026
राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा : ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदांना शासनाची मंजुरी
जळगाव

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा : ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदांना शासनाची मंजुरी

September 3, 2026
युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार : उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अशोक जैन यांची भेट
जळगाव

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार : उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अशोक जैन यांची भेट

September 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!

कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!

September 9, 2026
पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव

पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव

September 9, 2026
आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!

आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!

September 9, 2026
जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !

व्हॉट्सअॅपवर फोटो पाठवून बदनामीचा प्रयत्न; पीडित महिलेची शनिपेठ पोलिसात धाव

September 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group