• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

अमळनेरमध्ये मानाचा शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 16, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
अमळनेरमध्ये मानाचा शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १६  फेब्रुवारी २०२६ 

दरवर्षीप्रमाणे यंदाही सार्वजनिक शिवजयंती समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा मानाचा शिवजन्मोत्सव मोठ्या थाटामाटात, जल्लोषात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. शहरात सर्वत्र शिवप्रेमींचा उत्साह शिगेला पोहोचला असून कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरु आहे.

या निमित्त नाट्यमंदिर परिसराची स्वच्छता व सुशोभीकरण करण्यात आले असून आकर्षक विद्युत रोषणाईची विशेष व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच अश्वरूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पॉलिश करून परिसर अधिक देखणा करण्यात येत आहे.

मिरवणुकीच्या प्रारंभी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते पूजन होणार असून मा. प्रांत अधिकारी मयूर भंगाळे, तहसीलदार सुराणा, डी.वाय.एस.पी. विनायक कोते, मुख्य अधिकारी गणेश शिंदे तसेच पी.आय. दत्तात्रय निकम यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

या भव्य सोहळ्यात दरवर्षी फक्त धार्मिक गाणे वाजवण्यात येतात. विविध शाळा व संस्थांच्या विद्यार्थ्यांकडून सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. सायरादेवी बोहरा इंग्लिश स्कूल विद्यार्थ्यांचे पथनाट्य, न्यू व्हिजन स्कूलच्या लहान मुलांचे कर्तृत्वपूर्ण सादरीकरण, वृक्षवल्ली महिला लेझीम पथकाचे सादरीकरण, रमाई लेझीम पथक, जीत स्टुडिओ ग्रुप यांचे छत्रपती शिवाजी महाराजांवरील नृत्याविष्कार, कन्हैया ग्रुप व रुबजी नगर ग्रुप यांच्या वतीने लाठी-काठी व तलवारबाजीचे प्रात्यक्षिक तसेच आदिवासी बांधवांचे ढोल पथक विशेष आकर्षण ठरणार आहे.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला कोणतेही गालबोट लागू नये, यासाठी समितीच्या वतीने विशेष दक्षता घेतली जाते. नगर परिषद, अमळनेर यांचे नेहमीप्रमाणे मोलाचे सहकार्य लाभले असून सर्व सहभागी कलावंतांचा सन्मान अतिप्राचीन मंगळ ग्रह मंदिर संस्थेच्या वतीने ट्रॉफी देऊन करण्यात येणार आहे.

मिरवणुकीदरम्यान विविध ठिकाणी अल्पोपहार व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. नगरपरिषद हायस्कूल येथे खान्देश रक्षक फाउंडेशन ग्रुप व आजी-माजी सैनिक फाउंडेशन यांच्या वतीने अल्पोपहार देण्यात येणार आहे. नगरपरिषद शाळा ते नाट्यमंदिर मार्गावर भूषण चौधरी यांच्या वतीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

पाचपांवली देवी मंदिर चौक येथे विजय पाटील (पाटील बिल्डर्स) यांचा कडून लस्सी वाटप, बसस्थानक येथे निलेश फार्मा यांच्या वतीने लस्सी वाटप, विजय मारोती मंदिर येथे हनुमान चालीसा पठणावेळी ‘किंग्स ऑफ किंग्स’ ग्रुपच्या वतीने (लाडू) प्रसाद वितरण, महाराणा प्रताप चौक येथे योगेंद्र बाविस्कर व तुषार बाविस्कर यांच्या वतीने थंड पेय वाटप, निखिल चव्हाण आणि करण नेरकर कडून कोर्टाच्या परिसरात शरबत वाटप, राज लाड यांच्या वतीने ताक वाटप, तर नाट्यमंदिर येथे आकाश परदेशी यांच्या वतीने थंड पेय वितरण करण्यात येणार आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही रणजित शिंदे यांच्या वतीने त्यांच्या चिरंजीव शिवतेज यांच्या वाढदिवसानिमित्त नाट्यमंदिर येथे शिवभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय सार्वजनिक शिवजयंती समितीच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून रक्तदात्यांचा सन्मान स्कूल बॅग भेट देऊन मा. डी.वाय.एस.पी. विनायक कोते व पी.आय. दत्तात्रय निकम यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. युवा मित्र परिवार नेहमीप्रमाणे समाजकार्यात अग्रेसर असून आदर्श शिवजयंती साजरी करणे हाच या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे समितीने सांगितले. सार्वजनिक शिवजयंती समितीच्या वतीने सर्व समाजबांधवांना शिवजन्मोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा देण्यात येत असून मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सव यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Posts

विधान परिषदेसाठी भाजपमध्ये रस्सीखेच; एकनिष्ठांना मिळणार का न्याय?
जळगाव

विधान परिषदेसाठी भाजपमध्ये रस्सीखेच; एकनिष्ठांना मिळणार का न्याय?

May 28, 2026
स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त कंजरभाट समाज युवा फाउंडेशनकडून अभिवादन !
जळगाव

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त कंजरभाट समाज युवा फाउंडेशनकडून अभिवादन !

May 28, 2026
अॅडमिशनचे स्वप्न घेऊन गेलेल्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत; भीषण अपघातात मृत्यू !
क्राईम

अॅडमिशनचे स्वप्न घेऊन गेलेल्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत; भीषण अपघातात मृत्यू !

May 28, 2026
बकरी ईदपूर्वी पोलिसांचा अॅक्शन मोडवर : रसलपूरसह सीमाभागात कडक बंदोबस्त !
क्राईम

बकरी ईदपूर्वी पोलिसांचा अॅक्शन मोडवर : रसलपूरसह सीमाभागात कडक बंदोबस्त !

May 28, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

देवगिरी बँक फसवणूक प्रकरण गाजलं : माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या मेव्हण्याला बेड्या !

May 28, 2026
रावेर हादरलं : महाविद्यालयीन युवतीला बेशुद्ध करून आळंदीत नेलं; जबरदस्ती लग्न आणि अत्याचार
राज्य

रावेर हादरलं : महाविद्यालयीन युवतीला बेशुद्ध करून आळंदीत नेलं; जबरदस्ती लग्न आणि अत्याचार

May 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
विधान परिषदेसाठी भाजपमध्ये रस्सीखेच; एकनिष्ठांना मिळणार का न्याय?

विधान परिषदेसाठी भाजपमध्ये रस्सीखेच; एकनिष्ठांना मिळणार का न्याय?

May 28, 2026
स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त कंजरभाट समाज युवा फाउंडेशनकडून अभिवादन !

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त कंजरभाट समाज युवा फाउंडेशनकडून अभिवादन !

May 28, 2026
अॅडमिशनचे स्वप्न घेऊन गेलेल्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत; भीषण अपघातात मृत्यू !

अॅडमिशनचे स्वप्न घेऊन गेलेल्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत; भीषण अपघातात मृत्यू !

May 28, 2026
बकरी ईदपूर्वी पोलिसांचा अॅक्शन मोडवर : रसलपूरसह सीमाभागात कडक बंदोबस्त !

बकरी ईदपूर्वी पोलिसांचा अॅक्शन मोडवर : रसलपूरसह सीमाभागात कडक बंदोबस्त !

May 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group