• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगाव : दक्षता पेट्रोलपंपावर १.३३ कोटींचा अपहार; पोलीस उपनिरीक्षक फरार, गुन्हा दाखल !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 18, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगाव : दक्षता पेट्रोलपंपावर १.३३ कोटींचा अपहार; पोलीस उपनिरीक्षक फरार, गुन्हा दाखल !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १८ फेब्रुवारी २०२६

जिल्हा पोलिस दलाच्या वेल्फेअर विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या दक्षता पेट्रोलपंपावरील तब्बल १ कोटी ३३ लाख रुपयांच्या अपहारप्रकरणी व्यवस्थापक असलेले पोलीस उपनिरीक्षक वाल्मीक मधुकर वाघ (५७, रा. साईनगर, निमखेडी शिवार) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ते सध्या फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.

जिल्हा पोलिस दलाच्या मानव संसाधन विभागामार्फत भास्कर मार्केटसमोरील दक्षता पेट्रोलपंप चालविला जातो. या पंपावरील दैनंदिन आर्थिक व्यवहारांची जबाबदारी वाल्मीक वाघ यांच्याकडे व्यवस्थापक म्हणून सोपविण्यात आली होती. दररोज पेट्रोल व डिझेल विक्रीतून जमा होणारी रोख रक्कम बँकेत भरणा करणे, त्याची अचूक नोंद ठेवणे तसेच रोखवही व भरणा पावत्या अद्ययावत ठेवणे ही त्यांची जबाबदारी होती.

दि. १२ फेब्रुवारी रोजी वाघ यांचा मुलगा शेखर वाघ यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची भेट घेऊन आपल्या वडिलांनी कोणालाही न सांगता घर सोडले असून पेट्रोलपंपाच्या हिशोबात मोठी गडबड झाल्याचे पत्राद्वारे कळविले. या माहितीची दखल घेत पोलिस अधीक्षकांनी तात्काळ व्यवहारांची पडताळणी करण्याचे आदेश मानव संसाधन विभागाचे प्रभारी संदीप पाटील यांना दिले.  तपासणीदरम्यान पेट्रोलपंपाच्या तिजोरीत केवळ १ लाख ९६ हजार २१९ रुपये रोख आढळले. मात्र बँकेत रक्कम जमा केल्याच्या पावत्या व संबंधित कागदपत्रे उपलब्ध नव्हती. त्यामुळे सखोल लेखापरीक्षणाचे आदेश देण्यात आले.

लेखापाल एस. आर. पलोड यांनी दि. १ एप्रिल २०२५ ते दि. ९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीतील आर्थिक व्यवहारांची तपासणी केली. त्यानुसार एकूण ४ कोटी ९३ लाख ७३ हजार ६८६ रुपयांची रोख विक्री झाली होती. त्यापैकी केवळ ३ कोटी ५९ लाख २५ हजार १८ रुपयेच बँकेत जमा करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. उर्वरित १ कोटी ३३ लाख ७५२ रुपयांचा अपहार झाल्याचे लेखापरीक्षणातून स्पष्ट झाले.

प्रभारी संदीप पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलिस ठाणे येथे वाल्मीक वाघ यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१६ (५) (लोकसेवकाद्वारे फौजदारी विश्वासघात) आणि कलम ३१८ (४) (फसवणूक) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड करीत आहेत.

तक्रारीनुसार, वाघ यांना वेळोवेळी रोख रक्कम बँकेत भरणा करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच रोखवही व भरणा पावती पुस्तक सादर करण्यास सांगण्यात आले होते. मात्र त्यांनी प्रत्येक वेळी वेगवेगळे बहाणे करून कागदपत्रे दाखविण्यास टाळाटाळ केल्याचे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, आरोपी उपनिरीक्षक फरार असून त्यांच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. तसेच तांत्रिक पुराव्यांच्या आधारे त्यांच्या मालमत्ता जप्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

Related Posts

‘तुझे बाहेर लफडे चालू आहेत’ म्हणाला अन विवाहित प्रेयसीने कुऱ्हाडी हल्ल्यात ठार केलं प्रियकराला !
जळगाव

‘तुझे बाहेर लफडे चालू आहेत’ म्हणाला अन विवाहित प्रेयसीने कुऱ्हाडी हल्ल्यात ठार केलं प्रियकराला !

February 18, 2026
स्वच्छता नाही तर कारवाई; गेंदालाल मिल परिसरात महापौर आक्रमक
जळगाव

स्वच्छता नाही तर कारवाई; गेंदालाल मिल परिसरात महापौर आक्रमक

February 18, 2026
‘मनो-मित्र’चा अनोखा उपक्रम; अध्यात्म आणि मानसिक आरोग्याचा सुंदर संगम
जळगाव

‘मनो-मित्र’चा अनोखा उपक्रम; अध्यात्म आणि मानसिक आरोग्याचा सुंदर संगम

February 18, 2026
जळगावात मनसेची नवी शाखा; ५० हून अधिक मुस्लिम तरुणांचा जाहीर प्रवेश
जळगाव

जळगावात मनसेची नवी शाखा; ५० हून अधिक मुस्लिम तरुणांचा जाहीर प्रवेश

February 18, 2026
कोर्ट परिसरातून दुचाकी लंपास; सराईत चोरटा चोरीच्या गाडीसह ताब्यात
क्राईम

कोर्ट परिसरातून दुचाकी लंपास; सराईत चोरटा चोरीच्या गाडीसह ताब्यात

February 18, 2026
कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
क्राईम

कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

February 18, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
‘तुझे बाहेर लफडे चालू आहेत’ म्हणाला अन विवाहित प्रेयसीने कुऱ्हाडी हल्ल्यात ठार केलं प्रियकराला !

‘तुझे बाहेर लफडे चालू आहेत’ म्हणाला अन विवाहित प्रेयसीने कुऱ्हाडी हल्ल्यात ठार केलं प्रियकराला !

February 18, 2026
स्वच्छता नाही तर कारवाई; गेंदालाल मिल परिसरात महापौर आक्रमक

स्वच्छता नाही तर कारवाई; गेंदालाल मिल परिसरात महापौर आक्रमक

February 18, 2026
‘मनो-मित्र’चा अनोखा उपक्रम; अध्यात्म आणि मानसिक आरोग्याचा सुंदर संगम

‘मनो-मित्र’चा अनोखा उपक्रम; अध्यात्म आणि मानसिक आरोग्याचा सुंदर संगम

February 18, 2026
जळगावात मनसेची नवी शाखा; ५० हून अधिक मुस्लिम तरुणांचा जाहीर प्रवेश

जळगावात मनसेची नवी शाखा; ५० हून अधिक मुस्लिम तरुणांचा जाहीर प्रवेश

February 18, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group