जळगाव मिरर | १८ फेब्रुवारी २०२६
शहरातील कोर्ट आवारातून ३ फेब्रुवारीला हिरोहोंडा कंपनीची एच.एफ. डिलक्स (एमएच-३९, टि- ६१०२) चोरीप्रकरणी भुसावळ पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे
या संदर्भात अॅड. रोकडे यांच्या तक्रारीवरून भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले, गुन्हे शाखेचे निरीक्षक राहुल गायकवाड, भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे पो.नि. उध्दव डमाळे यांनी तपास पथक तयार केले. जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि भुसावळ पोलिसांच्या समांतर तपासानंतर गोपनीय माहितीच्या आधारे संशयित मुक्ताईनगर येथील किरण उर्फ करण शालीग्राम पाटील यास चोरीच्या दुचाकीसह पोलिसांनी ताब्यात घेतले. अटकेदरम्यान संशयिताने सुरत (गुजरात) येथील पोलिस ठाण्यात दाखल असलेली होंडा शाईन (जीजे ०५, एनए ६१८०) चोरी केल्याचीही कबुली दिली. हा संशयित सतत दुचाकी चोरी करणारा असून यापूर्वी मलकापूर पोलीस ठाणे व भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यातही त्याच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई पो.कॉ. उमाकांत पाटील, प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे (जळगाव), राहुल भंडारे, राहुल भोई (भुसावळ शहर पोलीस), पो.कॉ. नितीन चौधरी (तालुका पोलीस स्टेशन, भुसावळ) यांनी करुन २ प्रमुख दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.




















