जळगाव मिरर | २३ फेब्रुवारी २०२६
खान्देश युनियन एज्युकेशन सोसायटी संचलित कै. गि. न. चांदसरकर पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यामंदिर, साने गुरुजी कॉलनी, जळगाव येथे सोमवार (२३ फेब्रुवारी २०२६) रोजी संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त रंगारंग कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सकाळी कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबा यांच्या फोटोचे पूजन करून करण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक श्री. श्याम ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना संत गाडगेबाबा यांच्या जीवनकथेबाबत माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना समाजकार्य, स्वच्छता, आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानाबाबत मार्गदर्शन केले.
विद्यार्थी व शिक्षकांनी शाळेतील आणि शाळेच्या आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता करून संत गाडगेबाबा यांना विनम्र अभिवादन केले. विद्यार्थ्यांनी हाताला कागद आणि झाडू घेतले, शाळेच्या अंगणातून ते आजूबाजूच्या रस्त्यांपर्यंत स्वच्छता मोहीम राबवली.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. श्याम ठाकरे यांच्यासह श्रीमती जयश्री पाटील, श्री. स्वप्निल भोकरे, श्री. महेश तायडे, सौ. पुनम पाटील, सौ. शारदा चौधरी, सौ. दीपिका सोनवणे, सौ. रोहिणी निकुम, सौ. मनीषा वाघ, सौ. उज्वला भामरे, सौ. सुनिता पाटील, सौ. प्रिया कोपरकर, श्री. भूषण अमृतकर यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवेची भावनाही वाढली आणि संत गाडगेबाबा यांच्या शिकवणींचे महत्त्व विद्यार्थ्यांना जाणीव झाली.




















