
जळगाव मिरर | २७ फेब्रुवारी २०२६
पत्नी माहेरी गेलेली असतांना मध्यरात्रीच्या सुमारास दीपक वसंत पवार (वय ३२, रा. शिवाजी नगर) यांनी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. त्यांच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील शिवाजी नगरात दीपक पवार हा तरुण वास्तव्यास असून तो मालवाहू वाहनावर चालक आहे. घरगुती भांडण झाल्यामुळे त्याची पत्नी माहेरी निघून गेल्या होत्या. त्यामुळे बुधवारी मध्यरात्रीच्य सुमारास दीपक पवार यांनी गळफास घेन आपली जीवनयात्रा संपविली. ही घटन गुरुवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आल्यानंतर पोलिसांन घटनास्थळी धाव घेतली.
त्यांन पंचनामा करुन मृतदेह शासकीन वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला याठिकाणी डॉक्टरांनी तपासणीअंती मयन घोषीत केले. आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यान अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी व तीन मुले असा परिवार आहे.




















