
जळगाव मिरर | २ मार्च २०२६
चोपडा तालुक्यातील एका गावात शनिवारी गोळीबारातून प्रेमाच्या त्रिकोणाची रक्तरंजित अखेर झाली. यात विवाहितेच्या प्रियकराने गोळी झाडून प्रेयसीला ठार केल्यामुळे तिचा सुखी संसार उद्ध्वस्त झाला. प्रेयसीच्या दोन्ही शाळकरी मुलांनी आई गमावली.
आत्महत्या केलेल्या देवानंद सुभाष धनगर (३५) या प्रियकरावर भामेर (ता. शिरपूर) येथे तर या घटनेनंतरही विवाहितेवर सासरच्यांकडून रात्री उशिरा निमगव्हाण येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या हत्याकांडासाठी आरोपीने पिस्तूल कोठून आणले याचा तपास पोलिस करत आहेत.दोघांमध्येही प्रेमसंबंध असले तरी गेल्या काही दिवसांपासून ही महिला देवानंदला टाळत होती. याच रागातून हे हत्याकांड घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, देवानंद व या महिलेत गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते. या घटनेत वापरलेले शस्त्र देवानंदकडे कुठून आले, याचा तपास पोलिस करत आहेत. याबाबत चोपडा पोलिस ठाण्यात मयत देवानंद धनगर याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




















