
जळगाव मिरर | ७ मार्च २०२६
स्वर्गीय धनराज प्रकाश चव्हाण यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणार्थ जळगाव शहरातील नवीन कानडा रोड परिसरातील अनुमान मंदिराजवळील शिवशंकर कॉलनी येथे भव्य दिव्य संगीतमय श्रीमत देवी भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा आयोजित केला जात आहे.
हा कार्यक्रम दिनांक 11 मार्च 2026 पासून सुरू होणार असून, कलश यात्रा 11 मार्च रोजी दुपारी चार वाजता होईल. कथा कार्यक्रमाची वेळ रात्री आठ ते 11 वाजे दरम्यान असेल आणि कथा संपल्याची सांगता 18 मार्च 2026 रोजी होणार आहे.
या कथासत्रात कथावाचक म्हणून ह.भ.प. भागवत महाराज देशमुख उपस्थित राहणार आहेत. याशिवाय कार्यक्रमात संगीत अलंकारासाठी ह.भ.प. सुजित महाराज, ह.भ.प. नितीन महाराज, ताल महर्षी ह.भ.प. दिनेश महाराज, सिंथ वादक ह.भ.प. शिवम जी महाराज, प्लांट वादक ह.भ.प. ललित महाराज हे सहभागी राहणार आहेत.
कार्यक्रमाच्या शेवटी, काल्याचे किर्तन 18 मार्च रोजी सकाळी नऊ ते अकरा वाजे दरम्यान पार पडेल. आयोजकांनी सर्व भाविक भक्तांना विनंती केली आहे की, हा भव्य दिव्य संगीतमय कथा यज्ञ अनुभवण्यासाठी उपस्थित राहावे. हा कार्यक्रम धार्मिक आणि सांगीतिक अनुभवाचा अद्वितीय सोहळा ठरणार असून जळगावमधील भक्तांसाठी संपूर्ण आठवडाभर दिव्य आध्यात्मिक अनुभूती घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.




















