• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

नारीशक्ती हीच राष्ट्रशक्ती – पालकमंत्री गुलाबराव पाटील

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 8, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
नारीशक्ती हीच राष्ट्रशक्ती – पालकमंत्री गुलाबराव पाटील
Share on FacebookShare on Twitter

जागतिक महिला दिनानिमित्त, मान्यवरांच्या हस्ते विविध शासकीय विभागांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान

जळगाव मिरर | ८  मार्च २०२६

आई, बहीण, पत्नी आणि मुलगी या चार शब्दांमध्ये स्त्रीचे संपूर्ण विश्व सामावलेले असून या चार नात्यांमुळेच कुटुंब उभे राहते, संस्कार रुजतात आणि समाजाचे भविष्य घडते. महाराष्ट्राची भूमी ही जिजाऊ, सावित्रीबाई फुले आणि अहिल्याबाई होळकर यांसारख्या कर्तृत्ववान महिलांनी पावन केलेली आहे. या भूमीत स्त्री केवळ कुटुंबाचा आधारस्तंभ नाही, तर समाज परिवर्तनाची एक मोठी शक्ती आहे. आज प्रशासनातील विविध क्षेत्रांमध्ये महिला आपली जबाबदारी समर्थपणे पार पाडत असून प्रत्येक ठिकाणी महिलांनी आपल्या कर्तृत्वाने आणि कष्टाने स्वतःची कार्यक्षमता सिद्ध केली आहे. महिला अबला नसून सबला आहे. समाजाचे रक्षण असो किंवा संस्कृतीची जपणूक असो, महिलांची भूमिका नेहमीच महत्त्वाची राहिली आहे. “नारीशक्ती हीच राष्ट्रशक्ती आहे” असे ठाम मत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले.

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जिल्हा नियोजन समिती कार्यालयात जळगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषद तसेच विविध शासकीय विभागांमध्ये उत्कृष्ट आणि प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी महिलांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे व खासदार स्मिताताई वाघ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या प्रसंगी उपस्थित सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देत पालकमंत्र्यांनी पुरस्कार प्राप्त सर्व महिलांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.कार्यक्रमाला जिल्हाधिकारी रोहन घुगे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, महिला व बालविकास अधिकारी आर.आर.तडवी उपस्थित होते.

पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, महिलांनी आपल्या आरोग्याबाबत जागरूक राहणेही अत्यंत गरजेचे आहे स्त्री आरोग्यदृष्ट्या सक्षम असेल तर संपूर्ण कुटुंब आणि समाज निरोगी राहतो. महिलांनी आयुष्यातील कितीही अडचणी आल्या तरी आनंदी राहून सकारात्मकतेने जीवन जगले पाहिजे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाच्या विविध योजना महत्त्वपूर्ण ठरत असल्याचेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री कन्यादान योजना, सुकन्या समृद्धी योजना, लाडकी बहीण योजना तसेच महिला बचत गट अनुदान योजना यांमुळे महिलांना आर्थिक व सामाजिक बळ मिळत आहे. तसेच स्वच्छ भारत अभियान, जल जीवन मिशन आणि इतर अनेक विकास योजनांमध्ये महिलांचा मोठा सहभाग असल्याचे त्यांनी नमूद केले.

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे म्हणाले, महात्मा जोतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांचे कार्य खूप मोठे असून त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया घातला त्यामुळे आज स्त्रियांना प्रत्येक क्षेत्रात संधी मिळाली असून त्यांची विविध क्षेत्रात प्रगती झाली आहे. सर्व क्षेत्रांमध्ये महिलांनी चांगली कामगिरी केली आहे. शासनाच्या बऱ्याच योजना घरोघरी जाऊन सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम आशा सेविका, अंगणवाडी सेविका, बचत गटाच्या महिलाच करीत आहेत. केंद्र व राज्य शासनाने महिलांना विविध क्षेत्रात संधी उपलब्ध करून दिल्यामुळे आज महिला स्वावलंबी होऊन प्रगती करीत आहेत. असे त्यांनी सांगितले.

खासदार स्मिता वाघ यावेळी म्हणाल्या, महिला आई, बहीण, पत्नी अशा वेगवेगळ्या स्वरूपात आपली भूमिका बजावत असते ही भूमिका बजावताना महिलांनी आपल्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणे आवश्यक आहे. एक महिला घर सांभाळते, कुटुंबाला सांभाळते नोकरी करते, व्यवसाय बघते सासू-सासर्‍यांची सेवा करते , मुलांकडे, पतीकडे लक्ष देते अशी विविध कामे एक महिला करीत असते त्यामुळे तिला आपण अष्टभुजेचे रूप म्हणतो. असे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी रोहन घुगे आपल्या मनोगत म्हणाले, लाडकी बहीण योजनेमुळे महिलांच्या आयुष्यात अमुलाग्र बदल घडून आला आहे. बचत गटामुळे त्यांची प्रगती होत आहे. महिलांनी विविध क्षेत्रात कार्य करीत असताना आपल्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणे आवश्यक आहे असे सांगितले.जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यावेळी म्हणाल्या, महिलांनी सर्व जबाबदारी सांभाळत सर्व क्षेत्रात काम करत असताना परंतु याबरोबरच स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देऊन स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. कार्यक्रमाला विविध शासकीय कार्यालयातील महिला अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Related Posts

एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या कॉन्स्टेबलने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या कॉन्स्टेबलने घेतला टोकाचा निर्णय !

March 9, 2026
तीन दिवसांच्या विश्व मराठी संमेलनात जळगावच्या कलावंतांचा जलवा !
जळगाव

तीन दिवसांच्या विश्व मराठी संमेलनात जळगावच्या कलावंतांचा जलवा !

March 9, 2026
ऐतिहासिक विजय; महाराष्ट्रात जल्लोषासोबत काही शहरांत हिंसाचार आणि तणाव !
राज्य

ऐतिहासिक विजय; महाराष्ट्रात जल्लोषासोबत काही शहरांत हिंसाचार आणि तणाव !

March 9, 2026
रामेश्वर कॉलनीत संताप उफाळला : २३ मार्चला ‘जिवंतपणी तिरडीवर अंत्ययात्रा’ आंदोलनाचा इशारा
जळगाव

रामेश्वर कॉलनीत संताप उफाळला : २३ मार्चला ‘जिवंतपणी तिरडीवर अंत्ययात्रा’ आंदोलनाचा इशारा

March 9, 2026
गांधी तीर्थवर ‘पीस बिल्डर्स फोरम’चा शुभारंभ; शांती, न्याय व परिवर्तनावर राष्ट्रीय मंथन
जळगाव

गांधी तीर्थवर ‘पीस बिल्डर्स फोरम’चा शुभारंभ; शांती, न्याय व परिवर्तनावर राष्ट्रीय मंथन

March 9, 2026
पुन्हा हॉटेल व्यावसायिकाने संपविले आयुष्य : सुसाईट नोटमध्ये दोन नावांचा उल्लेख !
क्राईम

पुन्हा हॉटेल व्यावसायिकाने संपविले आयुष्य : सुसाईट नोटमध्ये दोन नावांचा उल्लेख !

March 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
एक लाखांच्या सुपारीवर पत्नीची हत्या? बुलढाण्यातील प्रकरणाने खळबळ

एक लाखांच्या सुपारीवर पत्नीची हत्या? बुलढाण्यातील प्रकरणाने खळबळ

March 9, 2026
एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या कॉन्स्टेबलने घेतला टोकाचा निर्णय !

एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या कॉन्स्टेबलने घेतला टोकाचा निर्णय !

March 9, 2026
तीन दिवसांच्या विश्व मराठी संमेलनात जळगावच्या कलावंतांचा जलवा !

तीन दिवसांच्या विश्व मराठी संमेलनात जळगावच्या कलावंतांचा जलवा !

March 9, 2026
एकनाथ शिंदे साहेबांचे मन मोठे; शिवसेना नेत्याच्या सल्ल्यामुळे रंगली चर्चा !

एकनाथ शिंदे साहेबांचे मन मोठे; शिवसेना नेत्याच्या सल्ल्यामुळे रंगली चर्चा !

March 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group