• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

माणुसकीचा थरारक क्षण, दुर्दैवी शेवट : मुलांना वाचवताना दोन जण बुडाले !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 9, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
माणुसकीचा थरारक क्षण, दुर्दैवी शेवट : मुलांना वाचवताना दोन जण बुडाले !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ९ मार्च २०२६

भडगाव शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देणाऱ्या दोघांच्या बलिदानाने रविवारी संपूर्ण भडगाव तालुका सुन्न झाला. गिरणा नदीपात्रात बुडणाऱ्या लहान मुलांना वाचवण्यासाठी धाडसाने पाण्यात उतरलेल्या नदीम खान नसीम खान (वय २७) आणि काफिया शरीफ पिंजारी (वय १६) या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे शहरावर शोककळा पसरली असून, अवैध वाळू उपशामुळे झालेल्या खड्ड्यांनी या निष्पाप जीवांचा बळी घेतल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार,  रविवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास गिरणा नदीपात्रात काही लहान मुले पाण्यात वाहतांना दिसून आली. जवळच काफिया कपडे धुत होती. त्यांना वाचवण्यासाठी काफीयाने नदीत उडी घेतली. तिला पाण्याचा अंदाज न लागल्याने ती देखिल बुडू लागली. दरम्यान नदीमला ही माहिती मिळताच तो धावत येऊन जीवाची पर्वा न करता त्यानेही नदीत उडी घेतली. तसेच बुडणाऱ्या मुलांना त्याने पाण्याबाहेर काढले मात्र, बुडणाऱ्या युवतीला वाचविण्याच्या प्रयत्नात नदीमला स्वतः जीव गमवावा लागला. नदीपात्रात असलेल्या खोल खड्ड्यांमुळे नदीम व काफिया या दोघांना बाहेर निघता आले नाही, दुर्दैवाने दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

लहान बालकांचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात टाकून माणुसकी जिवंत ठेवणाऱ्या युवक युवतीचा मृत्यू झाल्यामुळे भडगाव परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. सर्वांच्या मनाला चटका लावून जाणाऱ्या घटनेनंतर भविष्यात अशी घटना घडू नये म्हणून वाळू माफियांवर कारवाई होणार का? प्रशासन याबाबत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

घटनेची माहिती मिळताच आ. किशोर पाटील यांनी भडगाव ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच प्रदी मलचे, नगरसेवक आसिम मिर्झा, अलीम शाह आणि डॉ. विजयकुमार देशमुख यांनीही या कठीण प्रसंगात धीर दिला. तर गटनेत लखिचंद पाटील यांनी तात्काळ रुग्णवाहीका उपलब्ध करुन दिली.

यादुर्घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये मोठा संताप पाहायला मिळत आहे. ‘रात्रीच्या वेळी जेसीबीच्या साहाय्याने जो अवैध वाळू उपसा होतो, त्यामुळे नदीपात्रात धोकादायक खोल खड्डे तयार झाले आहेत. याच खड्‌ड्यांमुळे आज दोन तरुण तरुणीला जीव गमवावे लागले, असा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. प्रशासनाने वाळू माफियांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि महसूल, नगरपरिषद प्रशासनाचे अधिकारी व पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक महेश शर्मा, महसूल विभागाचे तलाठी अविनाश जंजाडे आणि प्रशांत कुंभारे, राजू अहिरे, इकबाल शेख, नगरसेवक इमरान अली सय्यद यांनी तातडीने यंत्रणा हलवल्या. मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी पाचोरा येथून विशेष पथक पाठविले. नगरपरीषदेचे छोटु वैद्य, अजय कंडारे, नितीन पारचे, सदीप पाटील आणि पाचोरा येथील गोताखोर हुसेन यांनी शोधमोहिम राबवली.

Related Posts

एक लाखांच्या सुपारीवर पत्नीची हत्या? बुलढाण्यातील प्रकरणाने खळबळ
क्राईम

एक लाखांच्या सुपारीवर पत्नीची हत्या? बुलढाण्यातील प्रकरणाने खळबळ

March 9, 2026
एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या कॉन्स्टेबलने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या कॉन्स्टेबलने घेतला टोकाचा निर्णय !

March 9, 2026
तीन दिवसांच्या विश्व मराठी संमेलनात जळगावच्या कलावंतांचा जलवा !
जळगाव

तीन दिवसांच्या विश्व मराठी संमेलनात जळगावच्या कलावंतांचा जलवा !

March 9, 2026
ऐतिहासिक विजय; महाराष्ट्रात जल्लोषासोबत काही शहरांत हिंसाचार आणि तणाव !
राज्य

ऐतिहासिक विजय; महाराष्ट्रात जल्लोषासोबत काही शहरांत हिंसाचार आणि तणाव !

March 9, 2026
रामेश्वर कॉलनीत संताप उफाळला : २३ मार्चला ‘जिवंतपणी तिरडीवर अंत्ययात्रा’ आंदोलनाचा इशारा
जळगाव

रामेश्वर कॉलनीत संताप उफाळला : २३ मार्चला ‘जिवंतपणी तिरडीवर अंत्ययात्रा’ आंदोलनाचा इशारा

March 9, 2026
गांधी तीर्थवर ‘पीस बिल्डर्स फोरम’चा शुभारंभ; शांती, न्याय व परिवर्तनावर राष्ट्रीय मंथन
जळगाव

गांधी तीर्थवर ‘पीस बिल्डर्स फोरम’चा शुभारंभ; शांती, न्याय व परिवर्तनावर राष्ट्रीय मंथन

March 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
एक लाखांच्या सुपारीवर पत्नीची हत्या? बुलढाण्यातील प्रकरणाने खळबळ

एक लाखांच्या सुपारीवर पत्नीची हत्या? बुलढाण्यातील प्रकरणाने खळबळ

March 9, 2026
एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या कॉन्स्टेबलने घेतला टोकाचा निर्णय !

एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या कॉन्स्टेबलने घेतला टोकाचा निर्णय !

March 9, 2026
तीन दिवसांच्या विश्व मराठी संमेलनात जळगावच्या कलावंतांचा जलवा !

तीन दिवसांच्या विश्व मराठी संमेलनात जळगावच्या कलावंतांचा जलवा !

March 9, 2026
एकनाथ शिंदे साहेबांचे मन मोठे; शिवसेना नेत्याच्या सल्ल्यामुळे रंगली चर्चा !

एकनाथ शिंदे साहेबांचे मन मोठे; शिवसेना नेत्याच्या सल्ल्यामुळे रंगली चर्चा !

March 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group