
जळगाव मिरर | १० मार्च २०२६
जागतिक महिला दिना निमित्त जळगाव येथील विभागीय कार्यशाळेत महिला दिनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. महिलांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमाला अधिकारी, कर्मचारी तसेच प्रशिक्षणार्थी महिलांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपयंत्र अभियंता किशोर पाटील होते, तर यंत्र अभियंता भालटिळक प्रमुख उपस्थिती म्हणून उपस्थित होते. यावेळी प्रभारक सोनवणे यांचीही विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप दारकोंडे यांनी केले, तर प्रस्ताविक सौ. कापसे यांनी मांडले.
कार्यक्रमात सौ. सरोदे मॅडम व योगिता मॅडम यांनी महिला सक्षमीकरणाविषयी मनोगत व्यक्त केले. तसेच संघटनेचे सचिव विलास सोनवणे यांनीही महिलांच्या कार्याची प्रशंसा करत आपल्या भावना व्यक्त केल्या.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संघटना अध्यक्ष प्रशांत चौधरी, कार्याध्यक्ष भरत परदेशी, सहसचिव निलेश चौधरी तसेच महिला सहसचिव निशा हिवाळे व हर्षा सरोदे यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमानिमित्त उपस्थित सर्व महिला कर्मचारी व प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनींचा पुष्पगुच्छ व फुले देऊन सत्कार करण्यात आला. तसेच प्रशासनातर्फे उपयंत्र अभियंता किशोर पाटील यांच्या हस्ते सर्व महिला भगिनी व प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनींना पेढे वाटप करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.




















