
जळगाव मिरर | १४ मार्च २०२६
मध्यरात्रीच्या सुमारास राहत्या घरामध्ये गळफास घेऊन भावेश नरेंद्र सपकाळे (वय २०, रा. म्हाडा कॉलनी) या तरुणाने आत्महत्या केली. ही घटना दि. १३ मार्च रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील म्हाडा कॉलनीत भावेश सपकाळे हा तरुण वास्तव्यास आहे. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास भावेश याने गळफास घेतल्यानंतर त्याच्या भावाला हा प्रकार लक्षात आला. त्यावेळी त्यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तरुणाच्या आत्म्हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.




















