
जळगाव मिरर | १५ मार्च २०२६
एकत्रित आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत जिल्हा सनियंत्रण व तक्रार निवारण समितीची बैठक नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालय येथे समितीचे पदसिद्ध अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी रोहनजी घुगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
याप्रसंगी समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. स्वप्निल सांगळे यांनी आयुष्यमान भारत योजना घेतलेल्या रुग्णालयांनी दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले. नागरिकांनाही आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम आपले आयुष्यमान कार्ड असणे आवश्यक आहे. महाराष्ट्राचा रहिवासी हा आपल्या योजनेत उपचार घेण्यासाठी पात्र आहे. पांढरी , केशरी व पिवळी यापैकी त्याची कोणतीही शिधापत्रिका असणे आवश्यक आहे. तसेच आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी कुटबाची ऑनलाईन शिधापत्रिका (डिजिटल) करून घ्यावी, तसेच त्यात नवीन सदस्य असतील तर त्यांचे नवे समाविष्ट करून अपडेट करून घ्यावे. कारण एकत्रित कुटुंबाची माहिती यात असल्याने मोबाईल नंबर लिंकिंग आधार कार्डही योजना प्रणालीशी जोडणे गरजेचे असल्याचे सांगितले.
तर जे रुग्णालय योजना घेऊन काम करीत नाही किंवा ज्यांनी काम अद्याप सुरू केले नाही अशा रुग्णालयांनी एक महिन्यात काम सुरू करावे अन्यथा कठोर कार्यवाही करण्यात आदेश देण्यात आले.
व्याधीग्रस्त गंभीर रुग्णांना रुग्णालयात गेल्यानंतर योजनेत लाभ घेताना त्रास होऊ नये याकरिता सर्व नागरिकांनी आपले आयुष्यमान कार्ड काढून घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. या बैठकीत जिल्ह्यातील रुग्णालयांचा संलग्नीकरण, रुग्णालयांचा योजनेच्या काम ,आयुष्यमान कर्ड केवायसी, आयुष्यमान भारत वय वंदना योजना याचा आढावा घेण्यात आला.
जिल्हा समन्वयक डॉ.सुमित जैन यांनी आशा सेविका, रेशन दुकानदार , सीएससी केंद्र तसेच रुग्णालयात असणार आरोग्य मित्र आदी जवळपास सहा हजार लोकांची टीम जिल्ह्यात सेवारत असल्याचे सांगिले . यापैकी कुणाकडेही गेल्यानंतर ते आपले आयुष्यांनान कार्ड काढून देतील असेही नमूद केले. याचबरोबर आयुष्यमान अप डाउनलोड करून सामान्य नागरिक स्वतः आपले आयुष्यमान कार्ड काढू शकतात याचीही माहिती दिली.याच बरोबर शून्य ते सत्तर वर्षापर्यंत या योजनेत कसा लाभ मिळू शकतो याबाबत माहिती देऊन शहर,तालुका तसेच जिल्हा स्तरावर रुग्णालयांची माहिती दिली.
योजनेत नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी सेवाभावी डॉक्टरांतर्फे तसेच सोशल मिडिया द्वारे जनजागृती करावी असे आवाहन डॉ. भरत बोरावले यांनी केले,. जेष्ठ नागरिक यांनी आयुष्यमान भारत वय वंदना कार्ड काढून यात यात स्वयस्फूर्त सहभागी व्हावे असे आवाहन अरुण माळी यांनी केले .
अस्थिरोग शस्त्रक्रिये करिता योजनेत समाविष्ट रुग्णालयांना काही अडचणी किंवा त्रुटी आहेत त्या दूर करण्यासाठी आरोग्य मित्र व त्या रुग्णालय प्रमुखांची कार्यशाळा घेऊन रुग्णहितासाठी कार्य करण्याचे आवाहन सदस्य मुकुंद गोसावी यांनी करून सामाजिक संस्था व नागरिकांनीही स्वयंभु पुढे येऊन आरोग्य योजनेचे कार्ड जोडण्याकरिता आरोग्य विभागाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी समितीचे जिल्हा सदस्य सचिव तथा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.स्वप्नील सांगळे ,जिल्हा आरोग्य अधिकारी ,जिल्हा समन्वयक( राज्य आरोग्य हमी सोसायटीचे)डॉ.सुमित जैन ,आयएमएचे डॉ. भरत बोरोले,
समिती अशासकीय सदस्य मुकुंद गोसावी ,ज्येष्ठ नागरिक संघ प्रतिनिधी अरुण देवराम माळी तसेच अंमलबजावणी सहाय्य संस्थेचे विभागीय प्रमुख डॉ. सुनिल राजपूत, जिल्हा प्रमुख डॉ. अनुराधा वाडीले, जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ कुणाल फेगडे, जिल्हा पर्यवेक्षक निलेश चौधरी, आरोग्यमित्र सुनील परखड, सागर राणे, दानिश शेख आदी उपस्थित होते.




















