
जळगाव मिरर | १५ मार्च २०२६
कोरोनाच्या पाहिल्या व दुसऱ्या लाटेत ठेका पद्धतीने काम करणाऱ्या अनुभवी कंत्राटी कामगारांना शासकीय वैदयकीय महाविदयालय व रुग्णालय जळगाव येथील स्मार्ट कंपनीच्या ठेक्या मध्ये कामावर रुजू करणे बाबत पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांना कंत्राटी कोरोना योद्धा संघर्ष समिती तर्फे आज दिनांक-१४/०३/२०२६ रोजी पाळधी येथील निवासस्थानी निवेदन देण्यात आले.
कोविड-१९ महामारीत पहिल्या-दुसऱ्या लाटेत शासकीय वैदयकीय महाविदयालय व रुग्णालय जळगाव तसेच जळगाव शहर महापालिकेच्या कोविड केअर सेंटर,जिल्हा शासकीय महिला रुग्णालय मोहाडी,जळगाव येथे कंत्राटी पद्धतीने वर्ग-3 व वर्ग-4 च्या कंत्राटी कामगारांची नियुक्ती करण्यात आलेली होती.
वास्तविक पाहता कोरोनाच्या पहिल्या-दुसऱ्या लाटेत सेवा बजाविलेल्या काही अनुभवी कोविड कंत्राटी कामगार यांना स्मार्ट कंपनीने पुन्हा सेवेत घेतले पाहिजे होते. परंतू जुन्या काही अनुभवी कंत्राटी कामगारांना डावलण्यात आलेले आहे. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे.आणि ओळखीच्या तसेच वशिल्याबाजीच्या व्यक्तींना स्मार्ट कंपनीने कंत्राटी कामगार म्हणून घेतले आहे.
उर्वरीत राहिलेल्या कोविड कंत्राटी कामगारांना कामाची अत्यंत गरज असल्याने त्यांना स्मार्ट कंपनीच्या ठेक्यामध्ये कंत्राटी स्वरूपात कंत्राटी कामगारांना त्यांच्या शैक्षणिक अहर्तेनुसार ठेक्यामध्ये रुजू करून घेण्यात यावे हि नम्र विनंती.
खालीलप्रमाणे कोविड कंत्राटी कामगारांना स्मार्ट कंपनीच्या ठेक्यात रोजंदारीवर/दरमहा वेतनावर रुजू करण्यात यावे. निलेश जयराज बोरा, बबन गोकूळ सावळे,भूषण भास्करराव पाटील,विलास दगडू तायडे,कुणाल सुनिल विसपूते,कृष्णा शांताराम सावळे, विनोद बुधा सपकाळे,रविंद्र गोरख कोळी,सागर मोतिराम चौधरी,रमेश समाधान वानखेडे,जयेश रविंद्र वसाने,सागर रविंद्र बाविस्कर, सुनिल जुलालसिंग परदेशी,शब्बीर खान इब्राहीम खान,अजय विष्णू सैंदाणे,शिला उत्तम सपकाळे,एश्वर्या रामकृष्ण सपकाळे,प्रतिक्षा रविशेखर सोनवणे,सोना भगवान सुरवाडे,दिपाली सुरेश भालेराव,ललीता उमेश पवार, जितेंद्र देविदास वाणी,मयूर राजेंद्र मराठे,मयूर रविंद्र लोहार, सुमित नितीन पोलभूणे, गजेंद्र नारायण सोनार,प्रशांत बापू सोनवणे, युवराज दगडू रखमे,यांनी स्मार्ट कंपनीत रोजगार मिळणेकामी निवेदन दिलेले आहे.




















