
संघटनेच्या ध्येय-धोरणांची अंमलबजावणी आणि जबाबदारीसह काम करण्याची अपेक्षा; कार्यकाळ एक वर्षाचा
जळगाव मिरर | १५ मार्च २०२६
जळगाव शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत महत्त्वाची नियुक्ती करण्यात आली असून आशुतोष जाधव यांची जळगाव शहर उपमहानगर अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती मनसेचे नेते ॲड. जयप्रकाश बाविस्कर यांनी जाहीर केली.
नियुक्तीपत्रानुसार, आशुतोष जाधव यांच्यावर जळगाव शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ध्येय-धोरणे, कार्यक्रम आणि संघटनात्मक उपक्रम निष्ठेने राबवण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच संघटनेच्या कार्यात कुठलाही तडजोड किंवा कुचराई स्वीकारली जाणार नाही, असा स्पष्ट निर्देश देखील नियुक्तीपत्रात दिला आहे.
ही नियुक्ती एक वर्षाच्या कालावधीसाठी असून त्या कालावधीत केलेल्या कामाचा अहवाल पाहून पुढील मुदतवाढीबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. नियुक्तीपत्रात आशुतोष जाधव यांनी समाजात शिस्तबद्ध व जबाबदार कार्य करून मराठी बांधव, भगिनी आणि मातांना अभिमान वाटेल असा परिणाम साधावा, ही अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, विभागाध्यक्ष राहुल चव्हाण, खुशाल ठाकूर, पंकज चौधरी यांचा समावेश होता. उपस्थित मान्यवरांनी आशुतोष जाधव यांना त्यांच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या तसेच संघटना बळकट करण्यासाठी सक्रियपणे काम करण्याचे आवाहन केले.





















