
जळगाव मिरर | १६ मार्च २०२६
छोट्या वाहनात निर्दयतेने कोंबून गोवंश कत्तलीसाठी नेताना गोरक्ष यांनी दि.१४ रोजी पकडून चाळीसगाव शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून ५ लाख रुपये किंमतीचे २ वाहनासह १ लाख ६२ हजार रुपये किमतीचे ३ बैल व ४ गोहे ताब्यात घेवून वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि.१४ रोजी सकाळी १०-२८ वाजेच्या सुमारास चाळीसगांव ते भडगांव रोड वर पातोंडा रोडवर दौलत हॉटेल जवळ पांढ-या रंगाची सुझुकी कंपनीची सुपर कॅरी मॉडल असलेली एमएच ५४-०३११ गाडीमध्ये एक लाख रुपये किमतीचे ४ गोवंश जातीचे गोहे दोरीच्या साहाय्याने निर्दयतेने बांधून त्यांना वेदना होतील, असे कत्तलीसाठी कोंबून विनापरवाना घेवून जाताना मिळून आले.
तर दि. १० मार्च रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास चाळीसगांव ते जामडी रोड वर वाघडू गावातील बस स्टँडवरील रोडवर २ लाख ५० हजार रुपये किमतीची मालवाहतूक टाटा एस कंपनीची एमएच १९-६७२३ गाडीमध्ये ६२ हजार रुपये किमतीचे ३ गोवंश जातीचे बैल दोरीच्या साहाय्याने निर्दयतेने बांधून त्यांना वेदना होतील, असे कत्तलीसाठी कोबूंन विनापरवाना घेवून जातांना मिळून आले. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.




















