
जळगाव मिरर | २० मार्च २०२६
यावल तालुक्यातील हरिपुरा परिसरात सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या हरिपुरा धरणाजवळ एका सुमारे ३८ वर्षीय अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, मृताची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी आवाहन केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हरिपुरा येथील धरणाच्या कोरड्या भागात बुधवारी हा मृतदेह आढळून आला. याबाबतची माहिती हरिपुरा येथील पोलीस पाटील ज्योत्ना तडवी यांनी यावल पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला व पुढील तपासासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला आहे. अद्याप मृताची ओळख पटलेली नसून, नागरिकांनी याबाबत माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पासपोळे करीत आहेत.




















