• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

‘लाडकी बहीण’ योजनेची अंतिम मुदत जवळ; ई-केवायसीसाठी महिलांची धावपळ !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 21, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
‘लाडकी बहीण’ योजनेची अंतिम मुदत जवळ; ई-केवायसीसाठी महिलांची धावपळ !
Share on FacebookShare on Twitter

३१ मार्चपर्यंत प्रक्रिया पूर्ण न केल्यास लाभ धोक्यात; तांत्रिक अडचणींमुळे लाभार्थी त्रस्त

जळगाव मिरर | २१ मार्च २०२६ 

मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दिलेली वाढीव मुदत ३१ मार्च रोजी संपत असल्याने राज्यभरातील महिलांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अपुरी कागदपत्रे, तांत्रिक अडचणी आणि प्रक्रियेतील गोंधळामुळे अनेक महिलांना वेळेत ई-केवायसी पूर्ण करता येत नसल्याने योजनेतून अपात्र ठरण्याची भीती वाढली आहे.

सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, ई-केवायसी पूर्ण न झाल्यास संबंधित महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे दरमहा मिळणाऱ्या आर्थिक सहाय्यापासून वंचित राहण्याची भीती महिलांमध्ये व्यक्त होत आहे.

सध्या केवळ सुमारे ६० टक्के महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्याची माहिती समोर येत असून, उर्वरित महिलांसाठी वेळ अत्यंत कमी उरला आहे. त्यामुळे ई-सेवा केंद्रे, बँका आणि संबंधित शासकीय कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. मुदत संपण्यास अवघे काही दिवस उरल्याने महिलांची धावपळ वाढली आहे.

दरम्यान, अनेक महिलांनी अर्ज भरताना चुकीची माहिती भरल्याचेही समोर आले आहे. विशेषतः कुटुंबातील सदस्य शासकीय किंवा निमशासकीय सेवेत असल्याचा पर्याय चुकून निवडल्याने त्या अपात्र ठरण्याची शक्यता निर्माण झाली होती. ही चूक दुरुस्त करण्यासाठी शासनाने ३१ मार्चपर्यंत ऑनलाइन ई-केवायसीमध्ये सुधारणा करण्याची संधी दिली आहे.

६ फेब्रुवारीच्या शासन निर्णयानुसार, कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत असल्यास किंवा निवृत्तिवेतन घेत असल्यास संबंधित महिलेला योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे चुकीची माहिती दुरुस्त करणे अत्यावश्यक ठरले आहे.

याशिवाय, अपुऱ्या कागदपत्रांमुळे अनेक महिलांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी आधार लिंक आणि बँक खाते सक्रिय असूनही तांत्रिक कारणांमुळे सन्मान निधी थांबल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. तालुका स्तरावरील बँका आणि ई-सेवा केंद्रांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने ई-केवायसी पूर्ण झाली की नाही, याबाबत महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

दरम्यान, मदतीसाठी उपलब्ध असलेला हेल्पलाइन क्रमांक अनेकदा व्यस्त असल्याची तक्रार महिलांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे अडचणी सोडवण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याची खंत व्यक्त होत आहे.

मुदत संपण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना प्रशासनाने प्रक्रिया अधिक सुलभ करणे, तांत्रिक अडचणी तातडीने दूर करणे आणि लाभार्थींना योग्य मार्गदर्शन उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. अन्यथा, हजारो महिलांना या महत्त्वाकांक्षी योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

Related Posts

मेहरूण तलावाला सांडपाण्याचा विळखा : कायमस्वरूपी उपायांचे उपमहापौर मनोज चौधरींचे आदेश !
जळगाव

मेहरूण तलावाला सांडपाण्याचा विळखा : कायमस्वरूपी उपायांचे उपमहापौर मनोज चौधरींचे आदेश !

August 12, 2026
दूध संघाच्या इतिहासात सुवर्ण अध्याय ठरणार संस्थापक जे. टी. महाजन यांचे स्मारक
जळगाव

दूध संघाच्या इतिहासात सुवर्ण अध्याय ठरणार संस्थापक जे. टी. महाजन यांचे स्मारक

August 12, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

जळगाव एसीबीची कारवाई : जिल्हा परिषदेत सुरक्षा रक्षकांच्या नोंदणीसाठी ४.८० लाखांची लाच !

August 12, 2026
पथविक्रेत्यांवरील कारवाईविरोधात बहुजन मुक्ती पार्टी आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने!
जळगाव

पथविक्रेत्यांवरील कारवाईविरोधात बहुजन मुक्ती पार्टी आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने!

August 12, 2026
उद्या शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही जळगाव जिल्हा दूध संघात उद्घाटन !
जळगाव

उद्या शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही जळगाव जिल्हा दूध संघात उद्घाटन !

August 12, 2026
शासनाने ‘एकल, अविवाहित’ व्यक्तींसाठी प्रतिमाह मानधन सुरू करावे !
जळगाव

शासनाने ‘एकल, अविवाहित’ व्यक्तींसाठी प्रतिमाह मानधन सुरू करावे !

August 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मेहरूण तलावाला सांडपाण्याचा विळखा : कायमस्वरूपी उपायांचे उपमहापौर मनोज चौधरींचे आदेश !

मेहरूण तलावाला सांडपाण्याचा विळखा : कायमस्वरूपी उपायांचे उपमहापौर मनोज चौधरींचे आदेश !

August 12, 2026
दूध संघाच्या इतिहासात सुवर्ण अध्याय ठरणार संस्थापक जे. टी. महाजन यांचे स्मारक

दूध संघाच्या इतिहासात सुवर्ण अध्याय ठरणार संस्थापक जे. टी. महाजन यांचे स्मारक

August 12, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

जळगाव एसीबीची कारवाई : जिल्हा परिषदेत सुरक्षा रक्षकांच्या नोंदणीसाठी ४.८० लाखांची लाच !

August 12, 2026
पथविक्रेत्यांवरील कारवाईविरोधात बहुजन मुक्ती पार्टी आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने!

पथविक्रेत्यांवरील कारवाईविरोधात बहुजन मुक्ती पार्टी आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने!

August 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group