
जळगाव मिरर | २२ मार्च २०२६
जळगावमधील महावीर क्लासेस विद्यार्थ्यांसाठी ५वी ते १२वी पर्यंत सर्व स्तरांवर दर्जेदार शैक्षणिक तयारी देण्याचा ठसा उमटवत आहे. विशेषतः राज्य आणि CBSE बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच JEE, NEET आणि MHT-CET या स्पर्धा परीक्षांसाठी या क्लासेसमध्ये सर्वांगीण अभ्यासक्रम राबवला जातो.
महावीर क्लासेसच्या अभ्यासक्रमात केवळ पुस्तकांवर आधारित शिक्षण नव्हे तर संकल्पनात्मक आणि व्यावहारिक पद्धतीने शिकवणी दिली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना फक्त विषय समजून घेण्याचा नव्हे, तर त्या विषयात प्रावीण्य मिळवण्याचा संपूर्ण आधार मिळतो. या क्लासेसमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक लक्ष देऊन त्याच्या शैक्षणिक कमतरता ओळखून सुधारणा करण्यात येते. तसेच NCERT सोबतच स्पर्धा परीक्षांसाठी प्रश्न सोडवण्याचा वेग आणि अचूकता वाढवण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जाते.
महावीर क्लासेसच्या शिष्यवृत्ती योजना (M-SAT) अंतर्गत विद्यार्थ्यांना ९०% पर्यंत शिष्यवृत्ती मिळण्याची सुवर्णसंधी उपलब्ध आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक क्षमतेनुसार उचित आर्थिक मदत मिळते, ज्यामुळे आर्थिक अडचणींमुळे शिक्षणात अडथळा येत नाही.
तज्ञ शिक्षक आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली नियमित संका निरसन सत्रे, मॉडेल पेपर्स, वेगवान गणित व MCQ सोडवण्याचे प्रशिक्षण व शैक्षणिक मार्गदर्शन मिळते. यामुळे विद्यार्थी परीक्षांमध्ये आत्मविश्वासाने उतरतात. महावीर क्लासेसमधील महत्त्वाचे आयोजन म्हणजे येत्या २२ व २९ मार्च रोजी आयोजित होणारा M-SAT (Mahaveer Scholarship Cum Admission Test). या परीक्षेत सहभागी होऊन योग्य गुणवत्ता सिद्ध केल्यास ९०% पर्यंत शुल्कात सवलत मिळू शकते.
ही सुवर्णसंधी विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक स्वप्नांच्या पूर्ततेसाठी एक मोठा टप्पा ठरू शकते. अधिक माहितीसाठी आणि नोंदणीसाठी महावीर क्लासेसशी संपर्क साधा: 📞 98205 11774 / 94227 72222 ठिकाण: कण्याशाळेच्या समोर, जळगाव




















