
जळगाव मिरर | २४ मार्च २०२६
कुटुंबियांसह गावी गेलेल्या सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक मगन मोहीते (वय ६२, रा. विठ्ठलवाडी, निमखेडी रोड) यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी डल्ला मारला. याठिकाणाहून ७३ हजार रुपयांच्या रोकडसह सोने आणि चांदीचे दागिने असा एकूण २ लाख ४० हजारांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना सोमवारी उघडकीस आली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात पोलीसांचे घर सुरक्षीत नाही तर सर्वसामान्यांचे काय असा सवाल उपस्थित होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील विठ्ठलवाडीत राहणारे मगन धनाजी मोहीते हे पोलीस दलातून पोलीस निरीक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले आहे. त्यांचे धुळे जिल्ह्यातील होळनाथे या मूळ गावी शेत असल्याने शेतीसाठी ते अधूनमधून जात असतात. त्यानुसार दि. २२ मार्च रोजी ते पत्नीसह गावी गेलेले असताना दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी घरातील साहित्य अस्ताव्यस्त फेकून कपाटातील रोख ७३ हजार रुपये, ११ ग्रॅम वजनाचे सोन्याचे तुकडे, १ तोळ्याची चेन, ७ भाराच्या चांदीच्या पैंजण असा एकूण २ लाख ४० हजार ५०० रुपये किमतीचा ऐव चोरून नेला.
मोहिते दाम्पत्य गावी असताना त्यांच्न घरासमोरील महिलेने त्यांच्याशी संपव साधून घराचा दरवाजा उघडा असल्याच महिती दिली. त्यानंतर कुटुंबीय घरी परतले पाहणी केली असता रोकडसह दागिने चोरील गेल्याचे लक्षात आले. या प्रकरणी मगन मोहि यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिल त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखन करण्यात आला आहे.




















