
जळगाव मिरर | २७ मार्च २०२६
शाळेतून घरी जाणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून रस्त्यावर थांबवून तिचा विनयभंग केल्याची घटना शहरातील एका शाळेजवळ घडली. याप्रकरणी एकाविरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावातील विद्यार्थिनी शाळा सुटल्यानंतर सायकलवरून आपल्या घराकडे जात असतांना संशयित याने स्कुटीवरून या मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार २४ मार्चला दुपारी १२.१० वाजेच्या सुमारास घडला. याच संशयिताने यापूर्वीही पीडित मुलीस चिठ्ठी देवून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता. मुलीने हा प्रकार घरी सांगितल्यानंतर पीडिताने पोलीस ठाण्यात धाव घेत दिलेल्या फिर्यादीवरून संशयिताविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला असून तपास पो. उ.नि. अरूण बाविस्कर, हवालदार किशोर पाटील करत आहेत.





















