• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगाव मनपेत स्वीकृत नगरसेवक निवडीत रंगत; ५ अर्ज वैध, भाजपला मुदतवाढ तर ठाकरे गटाचा निर्णय प्रलंबित

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 28, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
जळगाव मनपेत स्वीकृत नगरसेवक निवडीत रंगत; ५ अर्ज वैध, भाजपला मुदतवाढ तर ठाकरे गटाचा निर्णय प्रलंबित
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २८ मार्च २०२६

जळगाव महानगर पालिकेतील ७ स्वीकृत नगरसेवक निवडीसाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आले असून शुक्रवारी झालेल्या अर्ज छाननी प्रक्रियेत पाच अर्ज वैध ठरले आहेत. यात भाजपचे तीन तर शिवसेनेच्या दोन उमेदवारांचा सामावेश आहे. तसेच भाजपच्या दोन अर्जात तांत्रिक त्रुटी असल्यामुळे भाजपला मुदत वाढ देण्यात आली आहे. तर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गटनेत्यांबाबत संभ्रम असल्यामुळे ठाकरे गटाच्या स्वीकृत नगरसेवकाचा विषय प्रलंबित ठेवण्यात आला आहे.

महापालिकेत सात जागांवर स्वीकृत नगरसेवक निवडीची अर्ज छाननीची प्रक्रिया आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या दालनात झाली. यावेळी नगरसचिव सतीश शुक्ला उपस्थित होते. अर्ज छाननी प्रक्रियेत भाजपकडून दाखल केलेल्या अर्जात डॉ. राधेश्याम चौधरी, प्रदीप रोटे आणि रमेश मताणी यांचे तर शिवसेनेकडून हर्षल मावळे व नरेंद्र सोनवणे या पाचही जणांच्या कागदपत्रांची पूर्तता झाल्याने त्यांन स्वीकृत नगरसेवक पदाची संधी मिळणे आत निश्चित मानले जात आहे.

स्वीकृत सदस्यांच्या अर्ज छाननी प्रसंगी भाजपचे गटनेते प्रकाश बालाणी, नितीन लढा विशाल त्रिपाठी यांच्यासह शिवसेनेकडून माजी महापौर तथा जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे नगरसेवक अॅड. दिलीप पोकळे, गणेश सोनवणे, कुंदन काळे उपस्थित होते. तसेच शिवसेना उबाठाचे जिल्हाध्यक्ष कुलभूषण पाटील, इब्राहिम पटेल, अर्शनाबी खाटीक शरद तायडे उपस्थित होते. यावेळी भाजप व दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांकडून आयुक्तांच भेट घेऊन चर्चा केली.

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे गटनेते इब्राहिम पटेल यांनी युगंधरा सोळुंके यांचा अर्ज दाखल केला. युगंधरा सोळुंके ह्या भाजपच्या असतांना त्यांना शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात येत असल्याची कुणकुण शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख कुलभूषण पाटील व महानगर प्रमुख शरद तायडे यांना लावली होती. त्यामुळे त्यांनी तातडीने दि. २२ रोजी गटनेता बदलून तसा प्रस्ताव दि. २३ रोजी विभागीय आयुक्तांना दिला. सदर प्रस्तावाची नोंद विभागीय आयुक्त कार्यालयात घेण्यात आली असून दि. २४ रोजी शिवसेना ठाकरे गटाच्या नवीन गटनेत्या म्हणून आर्शीनबानो शोएब खाटीक असल्याचे पत्र जिल्हा प्रमुख यांनी मनपा आयुक्तांना दिले. परंतु विभागीय आयुक्तांकडून पत्र आल्या शिवाय आपल्याला निर्णय घेता येणार नाही, असे सांगत मनपा आयुक्त ढेरे यांनी शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवकांचा अर्ज प्रलंबित ठेवला आहे. दरम्यान, सायंकाळी विभागीय आयुक्तांचे पत्र मनपा आयुक्तांना प्राप्त झाले असून त्यात अर्शीनबानो खाटीक यांचा अर्ज दप्तरी दाखल करून घेण्यात आला असे नमुद करण्यात आले आहे.

भाजपच्या एका जागेसाठी मुदतवाढ भाजपने चार जागांसाठी पाच नावे सुचवली होती. त्यापैकी सुभाष शौचे आणि राहूल वाघ यांच्या कागदपत्रांमध्ये काही त्रुटी आढळून आल्या आहेत. या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी त्यांना २ एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या दोघांपैकी नेमकी कोणाची वर्णी लागते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Posts

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी
क्राईम

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

October 8, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

दुचाकीला पिकअपची जोरदार धडक; सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

October 8, 2026
भाजपच्या बाराबलुतेदार सेलच्या महिला जिल्हाध्यक्षपदी पूनम खैरनार !
जळगाव

भाजपच्या बाराबलुतेदार सेलच्या महिला जिल्हाध्यक्षपदी पूनम खैरनार !

October 7, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

शेअर मार्केटच्या नफ्याचे आमिष; महिला वकिलाची ७ लाखांची फसवणूक ; एकाला अटक !

October 7, 2026
मुक्ताईनगरात १९ लाखांचा गुटखा जप्त : एकाला अटक !
क्राईम

मुक्ताईनगरात १९ लाखांचा गुटखा जप्त : एकाला अटक !

October 7, 2026
दुष्काळाच्या संकटात ‘राजूमामा’ धावले : मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत; सक्षम नागरिकांनाही मदतीचे आवाहन!
जळगाव

दुष्काळाच्या संकटात ‘राजूमामा’ धावले : मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत; सक्षम नागरिकांनाही मदतीचे आवाहन!

October 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

October 8, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

दुचाकीला पिकअपची जोरदार धडक; सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

October 8, 2026
दुखद बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन !

दुखद बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन !

October 8, 2026
भाजपच्या बाराबलुतेदार सेलच्या महिला जिल्हाध्यक्षपदी पूनम खैरनार !

भाजपच्या बाराबलुतेदार सेलच्या महिला जिल्हाध्यक्षपदी पूनम खैरनार !

October 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group