
जळगाव मिरर | २९ मार्च २०२६
रावेर तालुक्यातील निंभोरा येथे श्रीराम नवमी च्या दिवशी गावातील तरुणाईने मोठ्या उत्साहाने थाटामाटात बँड वाजंत्री च्या पथकाने प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव साजरा केला.
यावेळी मिरवणुकीमध्ये रथावर बालकलाकार राम लक्ष्मण सीता हनुमान यांची वेशभूषा करून त्यांना बसवण्यात आले होते हा देखावा अगदी पाहण्यासारखा होता सदरची मिरवणूक आठवडे बाजारातून निघून मेन रोड ने परत आठवडे बाजारात येऊन मिरवणुकीचा समारोप झाला.
या मिरवणुकीमध्ये गावातील मान्यवर दुर्गादास पाटील अमोल खाचणे अनिल बराटे मुन्ना सेठ वाणी दत्तात्रय बोरोले सुनील कोंडे विजय सोनार नयन सावळे विकी खाचणे ललित कोळंबे आप्पा पाटील भूषण चौधरी आकाश गोराडकर रोहित महाले समस्त उत्सव समितीचे सदस्य उपस्थित होते तसेच गोदावरी फाउंडेशनच्या डॉ केतकी ताई पाटील यांनी कार्यक्रमाला अगंतुक भेट दिली एपीआय मीरा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अभय ढाकणे पोलीस कर्मचारी किरण जाधव होमगार्ड यांनी कार्यक्रमाला चोख बंदोबस्त ठेवला.






















