
जळगाव मिरर | २९ मार्च २०२६
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर-लासूर मार्गावरील शिंदेवाडी फाटा परिसरात शनिवारी रात्री एका तरुणावर अत्यंत क्रूर हल्ला झाला. आरोपी अज्ञात हल्लेखोरांनी 32 वर्षीय सीताराम आळंजकर यांना निर्जन स्थळी नेऊन धारदार शस्त्राने गंभीर जखमी केले असून, धक्कादायक बाब म्हणजे हल्लेखोरांनी त्याच्या गुप्तांगावरही वार केले.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास सीताराम शिंदेवाडी फाट्यावरून जात होते. त्यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना रस्त्यालगत असलेल्या शाळेजवळून बळजबरीने उचलून जवळच्या निर्जन शेतात नेले. तिथे त्यांनी धारदार शस्त्राने वार करत गंभीर जखमी केले. हल्ल्यानंतर आरोपी सीताराम यांना रस्त्यावर टाकून पळ काढले. गंभीर जखमी अवस्थेत तो थोडक्यात मदतीसाठी विव्हळत पडला. घटनेची माहिती मिळताच त्यांचे चुलत भाऊ लक्ष्मण आळंजकर घटनास्थळी धाव घेऊन रात्री साडेआठच्या सुमारास सीताराम यांना गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
परिसरात या घटनेमुळे भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली. हल्ला जुन्या वादातून झाला की अन्य कोणत्याही कारणास्तव, याचा तपास पोलीस करत आहेत. स्थानिकांनी पोलिसांना घटनास्थळी तपासासाठी तातडीने बोलावले असून, पोलिस सध्या संभाव्य हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.






















