
जळगाव मिरर | ३० मार्च २०२६
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जळगाव जिल्हा संपर्क अध्यक्ष गजानन राणे साहेब रावेर लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असून, या दौऱ्यादरम्यान संघटना बांधणीला मोठा वेग आला आहे. या दौऱ्याचा एक भाग म्हणून धानोरा ता.चोपडा गावात मनसेच्या वतीने भव्य सदस्य नोंदणी कार्यक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी गजानन राणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “राज साहेबांचे विचार घराघरात पोहोचवण्यासाठी आणि स्थानिक युवकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मनसेची ही सदस्य नोंदणी मोहीम अत्यंत महत्त्वाची आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात मनसेचे संघटन अधिक मजबूत करण्यावर आमचा भर आहे.”
या कार्यक्रमाप्रसंगी जळगाव मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांनी कायदेशीर आणि संघटनात्मक बाबींवर मार्गदर्शन केले. तसेच रावेर लोकसभा मनविसे (विद्यार्थी सेना) जिल्हाध्यक्ष कल्पेश पवार यांनी युवकांच्या सहभागावर जोर दिला.
प्रमुख उपस्थिती: या कार्यक्रमाला जिल्हा संपर्क अध्यक्ष गजानन राणे यांच्यासह जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, मनविसे जिल्हाध्यक्ष कल्पेश राजेंद्र पवार, किरण तळेले, कल्पेश खैरनार, मनसे ग्रामपंचायत सदस्य लीला विशाल महाजन, विशाल महाजन,विष्णू कोळी,चैतन्य महाजन,महेंद्र पाटील आणि गावातील असंख्य तरुण व कार्यकर्ते उपस्थित होते.
धानोरा येथील ग्रामस्थांनी आणि तरुणांनी मोठ्या संख्येने मनसेमध्ये प्रवेश करून नोंदणी मोहिमेला प्रतिसाद दिला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेची ही सक्रियता चोपडा विधानसभा मतदारसंघात चर्चेचा विषय ठरत आहे.





















