• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

गिरणा नदीवरील सात बंधाऱ्यांचा प्रकल्प रखडला ; महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 6, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, सामाजिक
0
गिरणा नदीवरील सात बंधाऱ्यांचा प्रकल्प रखडला ; महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रशासनाला इशारा
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ६ एप्रिल २०२६ 

गिरणा नदीवरील सात साखळी बंधाऱ्यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला शासनाने मान्यता देऊनही पुढील कार्यवाही न झाल्याने जळगाव जिल्ह्यातील ६० ते ७० गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद चंद्र पवार गट) महिला जिल्हाध्यक्ष कल्पिता रमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला निवेदन देत तातडीने प्रकल्प सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनानुसार, गिरणा धरणाखालील गिरणा नदीच्या सुमारे १६८ किलोमीटरच्या पट्ट्यातील गावांना पिण्याच्या पाण्यासाठी दरवर्षी गिरणा धरणातील आवर्तनावर अवलंबून राहावे लागते. या भागात पाण्याची टंचाई तीव्र असून शेतकरी व नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या पाणीप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी गिरणा नदीवर विविध ठिकाणी सात साखळी बंधाऱ्यांचा प्रकल्प राबविण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी सातत्याने राज्य व केंद्र शासनाकडे केली होती. त्यानुसार, माननीय राज्यपालांच्या पत्राद्वारे या प्रकल्पाला नवीन प्रकल्प म्हणून मान्यता देण्यात आली होती.

तसेच, २८ डिसेंबर २०१८ रोजीच्या शासन निर्णयानुसार या प्रकल्पासाठी तब्बल ७११.१५ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पाचा शंभर टक्के खर्च केंद्र शासनाच्या अर्थसहाय्यातून करण्याची अटही नमूद करण्यात आली होती.

प्राथमिक सर्वेक्षणानुसार चाळीसगाव, भडगाव, पाचोरा आणि जळगाव तालुक्यातील मेहनबारे, बहाळ, पांढरद, परधाडे, करंगी, कानळदा या ठिकाणी पर्जन्यमान व नदीतील पाण्याचा सखोल अभ्यास करण्यात आला होता. त्यानुसार एकूण २४.४८१ दलघमी (०.९० टीएमसी) पाणी उपलब्ध असल्याचे निष्पन्न झाले असून, सातही बंधाऱ्यांसाठी स्वतंत्र पाणी उपलब्धता प्रमाणपत्र देखील देण्यात आले आहे. केंद्रीय जल आयोगाची मान्यता देखील या प्रकल्पाला मिळालेली आहे.

इतक्या सर्व प्रक्रिया पूर्ण होऊनही प्रत्यक्षात प्रकल्पाची अंमलबजावणी होत नसल्याबद्दल संताप व्यक्त करत कल्पिता पाटील यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे. “६० ते ७० गावांतील शेतकऱ्यांच्या पाण्याच्या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केल्यास राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने मोठे आंदोलन छेडले जाईल आणि उपोषणाचा मार्ग अवलंबला जाईल,” असा इशारा त्यांनी दिला आहे.

या निवेदनावर कल्पिता रमेश पाटील यांच्यासह वाय.एस. महाजन, अशोक लाडवंजारी, सुनील माळी, प्रतिभा शिरसाठ, हितेंद्र पाटील, मोहित पवार आदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. दरम्यान, या प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करून पाणीटंचाईग्रस्त गावांना दिलासा देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

Related Posts

कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू
क्राईम

कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

August 10, 2026
उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !
क्राईम

उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

August 10, 2026
पथदिवे बसवताना काळाचा घाला : वीजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

पथदिवे बसवताना काळाचा घाला : वीजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू !

August 10, 2026
आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!
क्राईम

आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!

August 9, 2026
रिक्षात राहिली दीड लाखांची बॅग; ‘नेत्रम’च्या कॅमेऱ्यांनी शोधला धागा, जिल्हा पेठ पोलिसांनी दागिने केले परत!
क्राईम

रिक्षात राहिली दीड लाखांची बॅग; ‘नेत्रम’च्या कॅमेऱ्यांनी शोधला धागा, जिल्हा पेठ पोलिसांनी दागिने केले परत!

August 9, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
जळगाव

खळबळजनक : अश्लिल व्हिडीओ पाठवल्याची धमकी देत वृद्धाची ९ लाखांत फसवणूक !

August 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

August 10, 2026
उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

August 10, 2026
पथदिवे बसवताना काळाचा घाला : वीजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू !

पथदिवे बसवताना काळाचा घाला : वीजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू !

August 10, 2026
आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!

आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!

August 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group