
जळगाव मिरर | ५ मे २०२६
चाळीसगाव येथील खरेदीखत व सुची क-०२ च्या प्रमाणित नकला देण्यासाठी लाच मागणाऱ्या खासगी इसमावर धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कारवाई केली. सुनिल शिवदास निकम (वय ४७, रा. आनंदवाडी, जुना मालेगाव रोड, चाळीसगाव) यास ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे पिलखोड (ता. चाळीसगाव) येथील रहिवासी असून त्यांच्या सर्वे नं. ४/१ व ४/२ मधील प्लॉट नं. १२ या बिनशेती प्लॉटच्या खरेदीखत व सुची क-०२ च्या प्रमाणित नक्कल मिळविण्यासाठी ते दि. ३० एप्रिल रोजी चाळीसगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयात गेले होते. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या सुनिल निकम उर्फ नाना यांनी संबंधित कागदपत्रांच्या नक्कल देण्यासाठी ९ हजार रुपयांची लाच मागितली. यातील ५ हजार रुपये त्यांनी तात्काळ स्वीकारले तर उर्वरित ४ हजार रुपये नक्कल देताना देण्याची मागणी केली होती.
तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांन याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभान धुळे कार्यालयाशी संपर्क साधला त्यानुसार विभागाच्या पथकाने पंचांसमध् पडताळणी करून सापळा रचला. सापळ्ळ कारवाईदरम्यान आरोपीने तक्रारदारास कागदपत्रांच्या नकला देत ४ हजार रुपन स्वीकारताना पथकाने त्यास रंगेहाब पकडले. या प्रकरणी चाळीसगाव शह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याव आला आहे.




















