जळगाव मिरर | १२ सप्टेंबर २०२६
शहरातील खोटेनगर येथील साई मोरया मित्र मंडळाचे यंदाचे २४ वे वर्षे असून साई मोरया गणेशोत्सव २०२६ अध्यक्षपदी केतन पाटील तर सचिवपदी प्रतीक सोनवणे यांची निवड संस्थापक अध्यक्ष उमाकांत जाधव उपाध्यक्ष हितेश पाटील सचिव सिद्धांत कदम यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

यंदाचे २४ वे वर्ष असल्यामुळे खोटे नगरामध्ये साई मोरयाचा बाप्पा तिरुपती बालाजी रूपात विराजमान होणार आहे. तसेच गणेश भक्तांसाठी अध्यात्मिक पर्यावरण पूरक सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे त्यामध्ये मनोरंजनपर खेळ, आरोग्य तपासणी शिबीर, कीर्तन, बालगोपालांसाठी शाडूमाती पासून गणपती बनवणे स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रक्तदान शिबिर, वृक्षरोपण, रांगोळी स्पर्धा प्रश्नमंजुषा अशा अनेक स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
साई मोरया मंडळ कार्यकारिणी २०२६
अध्यक्ष केतन पाटील, उपाध्यक्ष आदित्य कुमावत, , सचिव प्रतीक सोनवणे, सहसचिव गणेश कुमावत हर्षल पाटील, कार्याध्यक्ष चेतन कोळी, खजिनदार धीरज पाटील, सदस्य – दिनेश पाटील, अनिल चव्हाण, दीपक बारी, पंकज पाटील, प्रसन्न जाधव, मंथन ईशी, निखिल पाटील, कृष्णा पाटील, भूषण गीते, सुदर्शन ईशी, धीरज महाजन, ज्ञानेश्वर पाटील, जयेश महाजन,हर्षल चौधरी, अजय मोरे, गोपाल टीकारे, मोहित पाटील, लोकेश बारसे, वैभव चंद्रात्रे, कल्पेश ठाकरे, पराग पाटील, सोहम आमोदकर.





















