
जळगाव मिरर | ९ मे २०२६
गेल्या काही महिन्यापासून जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलीसोबत चुकीचे कृत्य होत असल्याच्या अनेक घटना उघडकीस येत असताना आता मुक्ताईनगर तालुक्यातील एका १६ वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कार, पोक्सो आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
दि. १८ एप्रिल रोजी संशयित आरोपी ईश्वर वाघ याने या मुलीला गाठले. तिच्यावर बलात्कार केला आणि त्याचा व्हिडीओ तयार केला. त्यानंतर आरोपीने ६ मे रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास पीडितेचा अश्लील व्हिडीओ व्हायरल केला. या प्रकारामुळे पीडितेच्या कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला आहे. अखेर पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलिसात नोंद केली आहे.





















