
जळगाव मिरर | ११ मे २०२६
घरगुती वादातून पुणे येथे सूनेचा खून करुन जळगावात वास्तव्यास असलेल्या संशयित भानुदास भास्कर चौधरी (रा. रायकर नळा) याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मेहरुण परिसरातील महादेव मंदिर परिसरातून मुसक्या अवाळल्या. त्याला पुढील चौकशीसाठी नांदेड सिटी पुणे पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घरगुती वादातून पुणे येथील रायकर नळा परिसरात राहणाऱ्या स्वाती तेजस चौधरी या महिलेचा तीचे सासरे भानुदास चौधरी यांनी डोक्यात वार करुन खून किला. त्यानंतर घराचा बाहेरुन कुलूप लावून संशयित पसार झाला होता. चरातून लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आल्यानंतर शेजारच्यांनी चटनेची माहिती महिलेचा पती तेजस चौधरी याला दिली. त्याने घरी येवून पाहिल्यानंतर त्याची पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. याप्रकरणी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यातील संशयित महिलेचा सासरा भानुदास चौधरी याचा पोलिसांकडून कसून शोध सुरु होता. परंतू तो मिळून येत नसल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहल गायकवाड यांना तो मेहरुण परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. त्यांनी पथक तयार करुन संशयित भानुदास चौधरी याला ताब्यात घेतले.
ही कामगिरी उपनिरीक्षक शरद बागल, सफौ अतुल वंजारी, पोहेकॉ विजय पाटील, अकरम शेख, नितीन बाविस्कर, प्रवीण भालेराव, मुरलीधर धनगर, राहुल रगडे, रविंद्र कापडणे, प्रदीप चौरे यांच्या पथकाने केली





















