पाचोरा : प्रतिनिधी
शेतकऱ्यांना अनुदान सह धान्य पुरवठा तात्काळ होण्यासाठी कॉंग्रेस पक्षाने शिंगाडा मोर्चा काढण्याचा इशारा निवेदना मार्फत दिला आहे.
तहसील कार्यालयातील शहर आणि तालुक्यातील विविध समस्या लवकर सोडविण्यासाठी पाचोरा कॉंग्रेस शिंगाडा मोर्चा आज दि. २१ मार्च २०२२ रोजी सकाळी १० वाजता आठवडे बाजारातुन काढणार आहे.
कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघणार आहे. या मोर्चात प्रमुख मागण्यात पाचोरा शहरातील स्वस्त धान्य दुकानातून जानेवारी – २०२२ चा मोफत धान्य चा अद्याप पुरवठा झाला नाही. यात तालुक्यातील काही ठिकाणी पुरवठा बाकी आहे तो तात्काळ देण्यात यावा. शहरातील जवळपास २ हजार २०० दारिद्र्य रेषेखालील कुटुंब आहेत मात्र केवळ चार कुटुंबांना लाभ दिला जातो गेल्या विस वर्षा पासुन बी.पी.एल. धारकांनावर अन्याय होत असुन त्यामुळे धान्य पुरवठा हक्काचा मिळत नाही. त्या कुटुंबाना तात्काळ समाविष्ट करण्यात यावा तसेच ज्यांच्या मुळे वंचित राहिले त्यांची चौकशी सुरू करुन कारवाई करण्यात यावी. शहर व तालुक्यात काही मयत लाभार्थीच्या नावे धान्य पुरवठा केला आहे संबंधित लाभार्थींनी या बाबत संबंधित दुकानदार यांना वेळोवेळी सुचित करुन बदल केला नाही अशा बेजबाबदार दुकानदार सह संबंधित अधिकारी यांच्या वर चौकशी करून कारवाई करण्यात यावी. विधवा परीतक्ता, दिव्यांग, अनाथ यांना बीपीएल मध्ये समाविष्ट करण्यात यावे. शेतकऱ्यांचे राहीलेल्या अनुदान तात्काळ देण्यात यावे यात वैगरे असलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना तात्काळ मोबदला देण्यात यावा.
शासकीय तुकडा बंदी कायदा असताना त्याची अंमलबजावणी नकरता बेकायदेशीर खरेदी होत असुन तलाठी त्याची नोंद गैरकायदा करत आहे याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी. या मागणी करीता काँग्रेस चा वतीने शिंगाडा मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित राहवे असे आवाहन काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी केले आहे.