
जळगाव मिरर | १६ मे २०२६
शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे तसेच शिवसेना तथा युवासेना सचिव आमदार वरुणजी सरदेसाई
यांच्या आदेशाने युवासेना जळगाव महानगर युवाधिकारी पदी प्रितम रवींद्र शिंदे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.
या नियुक्तीचे शिवसेना संपर्कप्रमुख तथा उपनेते संजय सावंत, गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील, महानगर प्रमुख शरद तायडे, युवासेना विभागीय सचिव विराज कावडीया, विस्तारक प्रवीण चव्हाण, युवासेना जिल्हायुवाधिकारी पियुष गांधी यांनी स्वागत केले आहे.





















