• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

17 विधान परिषद जागांसाठी रणधुमाळी; जळगावात इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 18, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य, सामाजिक
0
17 विधान परिषद जागांसाठी रणधुमाळी; जळगावात इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १८ मे २०२६ 

महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसू लागली असून विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या निवडणुकांची रणधुमाळी लवकरच रंगणार आहे. भारतीय निवडणूक आयोगाने राज्यातील प्रदीर्घ काळापासून रिक्त असलेल्या 17 विधान परिषद जागांसाठी अखेर अधिकृत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या जागांसाठी येत्या 18 जून 2026 रोजी मतदान होणार असून 22 जून 2026 रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील या जागा दीर्घकाळ रिक्त राहिल्यामुळे राजकीय पक्षांकडून सातत्याने निवडणुका घेण्याची मागणी केली जात होती. मात्र निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, संबंधित मतदारसंघातील किमान 75 टक्के स्थानिक स्वराज्य संस्था कार्यरत असणे तसेच किमान 75 टक्के लोकप्रतिनिधी पदावर असणे आवश्यक असते. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत ही अट पूर्ण न झाल्याने निवडणुका प्रलंबित राहिल्या होत्या.

आता राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सर्व आवश्यक निकष पूर्ण झाल्याचा अहवाल केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर केल्यानंतर आयोगाने तत्काळ निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून विविध पक्षांनी इच्छुक उमेदवारांच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

जळगाव विधान परिषद मतदारसंघातही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. विधान परिषदेचे माजी आमदार चंदूभाई पटेल यांचा कार्यकाळ संपल्यानंतर आता नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या निवडणुकीत नव्याने निवडून आलेले नगरपालिका, नगरपंचायत आणि महापालिकेचे नगरसेवक तसेच लोकनियुक्त नगराध्यक्ष मतदान करणार आहेत. मात्र जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सभापती यांना मतदानाचा अधिकार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नगरसेवकांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. भाजपाकडून नंदू अडवाणी, नंदू महाजन आणि माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील यांची नावे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहेत. दुसरीकडे शिवसेनेकडूनही या जागेवर दावा सांगितला जात असून महायुतीत जागावाटपावरून चुरस निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या विधान परिषद निवडणुका महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांकडून राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरू झाली आहे.

निवडणूक कार्यक्रम असा

  • अधिकृत अधिसूचना जारी : 25 मे 2026 (सोमवार)
  • उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत : 1 जून 2026 (सोमवार)
  • अर्ज छाननी : 2 जून 2026 (मंगळवार)
  • उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : 4 जून 2026 (गुरुवार)
  • मतदान : 18 जून 2026 (गुरुवार)
  • मतदानाची वेळ : सकाळी 8 ते दुपारी 4
  • मतमोजणी व निकाल : 22 जून 2026 (सोमवार)

Related Posts

शनिपेठ पोलिसांची वेळीच धडक; दोन अल्पवयीन मुलींचे बालविवाह रोखले !
क्राईम

शनिपेठ पोलिसांची वेळीच धडक; दोन अल्पवयीन मुलींचे बालविवाह रोखले !

July 14, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

मध्यरात्री एलसीबीचा मोठा ड्रग्जवर प्रहार; ३ लाखांचे एमडी जप्त, मुख्य पेडलर भैय्या सोनवणे फरार !

July 14, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

खंडेराव नगराजवळ धावत्या रेल्वेची धडक; ४७ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू

July 14, 2026
महिला प्राध्यापकांच्या वृक्षदानातून बहरणार सुबोनियो पक्षी घर; २०० बोगनवेलींची हरित भेट !
क्राईम

महिला प्राध्यापकांच्या वृक्षदानातून बहरणार सुबोनियो पक्षी घर; २०० बोगनवेलींची हरित भेट !

July 13, 2026
विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाला सलाम; विवेकानंद प्रतिष्ठानमध्ये भव्य सत्कार समारंभ
जळगाव

विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाला सलाम; विवेकानंद प्रतिष्ठानमध्ये भव्य सत्कार समारंभ

July 13, 2026
“खेळाच्या मैदानासाठी मुलांचा मनपात एल्गार : वादग्रस्त भूखंड प्रकरणी आयुक्त दालनाबाहेर ठिय्या; तात्काळ पंचनाम्याचे आदेश !
जळगाव

“खेळाच्या मैदानासाठी मुलांचा मनपात एल्गार : वादग्रस्त भूखंड प्रकरणी आयुक्त दालनाबाहेर ठिय्या; तात्काळ पंचनाम्याचे आदेश !

July 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
शनिपेठ पोलिसांची वेळीच धडक; दोन अल्पवयीन मुलींचे बालविवाह रोखले !

शनिपेठ पोलिसांची वेळीच धडक; दोन अल्पवयीन मुलींचे बालविवाह रोखले !

July 14, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी

मध्यरात्री एलसीबीचा मोठा ड्रग्जवर प्रहार; ३ लाखांचे एमडी जप्त, मुख्य पेडलर भैय्या सोनवणे फरार !

July 14, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

खंडेराव नगराजवळ धावत्या रेल्वेची धडक; ४७ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू

July 14, 2026
महिला प्राध्यापकांच्या वृक्षदानातून बहरणार सुबोनियो पक्षी घर; २०० बोगनवेलींची हरित भेट !

महिला प्राध्यापकांच्या वृक्षदानातून बहरणार सुबोनियो पक्षी घर; २०० बोगनवेलींची हरित भेट !

July 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group