• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

निमखेडी रोडवरील कुंटणखाना प्रकरणात धक्कादायक खुलासा; सुटका केलेली महिला निघाली बांग्लादेशी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 25, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
निमखेडी रोडवरील कुंटणखाना प्रकरणात धक्कादायक खुलासा; सुटका केलेली महिला निघाली बांग्लादेशी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २५ मे २०२६ 

तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील निमखेडी रोडवरील अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावर करण्यात आलेल्या कारवाईत धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी सुटका केलेल्या दोन महिलांपैकी एक महिला बांग्लादेशातील असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, तिच्याकडे आढळलेले आधारकार्ड बनावट असल्याचे उघड झाले आहे. या घटनेमुळे शहरात बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या बांग्लादेशी महिलांचे जाळे कार्यरत असल्याचा संशय पोलिसांना आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील निमखेडी रोडवरील ब्रम्हांडनायक अपार्टमेंट मधील एका फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावर तालुका पोलिसांनी दि. २१ मे रोजी छापा टाकून कारवाई केली होती. या कारवाईत सागर गुलाब सोनवणे (वय २३, रा. चोरगाव, ता. धरणगाव) व सीमा उर्फ कविता सुधीर मोरे (रा. म्हाडा कॉलनी) हे दोघे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वेश्या व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देत असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती.

या कारवाईदरम्यान दोन महिलांची सुटका करण्यात आली होती. त्यांना पुढील कार्यवाहीसाठी शासकीय आशादीप महिला वसतिगृहात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, पोलिसांनी दोन्ही महिलांची सखोल चौकशी सुरू केली असता, त्यापैकी एका २८ वर्षीय महिलेबाबत संशय निर्माण झाला.  सुरुवातीला संबंधित महिला पोलिसांना माहिती देण्यास टाळाटाळ करत होती. मात्र, पोलिसांनी तिचा मोबाईल तपासण्यासह बायोमेट्रिक पडताळणी केली असता तिच्याकडील आधारकार्ड बनावट असल्याचे समोर आले. त्यानंतर अधिक चौकशी केल्यावर ती महिला बांग्लादेशातील खुलना येथील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, गेल्या दोन आठवड्यांत जिल्ह्यात आढळून आलेली ही तिसरी बांग्लादेशी महिला असल्याने पोलिस यंत्रणांची चिंता वाढली आहे. यापूर्वी दि. ११ मे रोजी शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक बांग्लादेशी महिला विवाह करून वास्तव्यास असल्याचे समोर आले होते. त्यानंतर भुसावळमध्येही एक महिला बेकायदेशीररीत्या राहत असल्याचे उघड झाले होते. या दोन्ही प्रकरणांतील महिलादेखील न्यायालयीन कोठडीत असल्याची माहिती आहे.

विशेष म्हणजे, जळगाव शहरातील कुंटणखान्यांवरील कारवाईत दीड वर्षांच्या कालावधीत बांग्लादेशी महिला आढळण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी दि. २० डिसेंबर २०२४ रोजी जळगाव-भुसावळ राष्ट्रीय महामार्गालगतच्या एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी कारवाई केली होती. त्या वेळी एका अल्पवयीन बांग्लादेशी तरुणीची सुटका करण्यात आली होती.

आता निमखेडी रोड परिसरातील फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावर झालेल्या कारवाईत पुन्हा बांग्लादेशी महिला आढळून आल्याने शहरात किंवा जिल्ह्यात अशा महिलांचे संघटित रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून या दृष्टीने अधिक तपास सुरू असून, संबंधित महिलांच्या संपर्कातील व्यक्ती, बनावट कागदपत्रांची साखळी आणि संभाव्य मानवी तस्करीच्या कोनातूनही तपास केला जात असल्याची माहिती समोर येत आहे.

Related Posts

कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

कोथळी-सालबर्डी गावाजवळ भीषण दुचाकी अपघात; एकाचा जागीच मृत्यू, दोघे जखमी !

May 25, 2026
राज्यात भीषण अपघात; दरीत कोसळलेल्या चारचाकीतील आठ पर्यटकांचा मृत्यू !
क्राईम

राज्यात भीषण अपघात; दरीत कोसळलेल्या चारचाकीतील आठ पर्यटकांचा मृत्यू !

May 25, 2026
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे निवासी डॉक्टरांसाठी मोफत ‘हेपेटायटिस-बी’ लसीकरण शिबिर !
जळगाव

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे निवासी डॉक्टरांसाठी मोफत ‘हेपेटायटिस-बी’ लसीकरण शिबिर !

May 25, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

चौघांवर तडीपारीची कारवाई; वर्षभरासाठी जळगाव जिल्ह्यात प्रवेशबंदी !

May 25, 2026
पाणी भरताना विद्युत मोटारीचा शॉक; फेकरीतील महिलेचा जागीच मृत्यू !
क्राईम

पाणी भरताना विद्युत मोटारीचा शॉक; फेकरीतील महिलेचा जागीच मृत्यू !

May 25, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
जळगाव

वखार महामंडळाच्या छतावरून २० फुटांवरून पडून परप्रांतीय मजुराचा मृत्यू !

May 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

कोथळी-सालबर्डी गावाजवळ भीषण दुचाकी अपघात; एकाचा जागीच मृत्यू, दोघे जखमी !

May 25, 2026
राज्यात भीषण अपघात; दरीत कोसळलेल्या चारचाकीतील आठ पर्यटकांचा मृत्यू !

राज्यात भीषण अपघात; दरीत कोसळलेल्या चारचाकीतील आठ पर्यटकांचा मृत्यू !

May 25, 2026
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे निवासी डॉक्टरांसाठी मोफत ‘हेपेटायटिस-बी’ लसीकरण शिबिर !

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे निवासी डॉक्टरांसाठी मोफत ‘हेपेटायटिस-बी’ लसीकरण शिबिर !

May 25, 2026
निमखेडी रोडवरील कुंटणखाना प्रकरणात धक्कादायक खुलासा; सुटका केलेली महिला निघाली बांग्लादेशी !

निमखेडी रोडवरील कुंटणखाना प्रकरणात धक्कादायक खुलासा; सुटका केलेली महिला निघाली बांग्लादेशी !

May 25, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group