
जळगाव मिरर | २७ मे २०२६
शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात दि. २४ मे रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास काहीही कारण नसतांना अकील उर्फ भुऱ्या शेख अजगर (वय २२, रा. भारत नगर, खडकी चाळ) या तरुणाला काठीने मारहाण करीत गंभीर जखमी केले. याप्रकरणी दोघांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील खडकी चाळ परिसरातील भारत नगरात अकील उर्फ भुऱ्या शेख अजगर हा तरुण वास्तव्यास आहे. दि. २४ मे रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास काहीही कारण नसतांना संशयित अफताब, हारुण आणि दिप्या या तिघांनी काठीने अकील याला बेदम मारहाण केली. यामध्ये त्याचया डाव्या डोळ्यावर मानेवर गंभीर दुखापत झाली. दरम्यान, उपचार घेतल्यानंतर अकील शेख याने शहर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार संशयित तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ पंकज सपकाळे हे करीत आहे.





















