
जळगाव मिरर | २७ मे २०२६
अमळनेर शहरात संत शिरोमणी भिमा भोई यांची जयंती मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात सामूहिक आरती, महाभंडारा तसेच विविध धार्मिक उपक्रमांनी परिसर भक्तिमय झाला होता.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संत शिरोमणी भिमा भोई यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामूहिक आरती करण्यात आली. त्यानंतर महाभंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले. या उत्सवात भोईवाडा, बहादरपूर नाका, रुबीजीनगर तसेच पैलाड परिसरातील हजारो समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत जयंती उत्सव उत्साहात साजरा केला.
यावेळी समाजाच्या विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांचा भोई समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यामध्ये सुरेश शिंगाणे, अनिल महाजन, भीमराव शिंगाणे, रोहन वडिले, हिरालाल भोई, साहेबराव शिंगाणे, संतोष शिंगाणे, पांडुरंग शिंगाणे, सुदाम शिंगाणे, देविदास भोई, पंकज मोरे, प्रकाश शिंगाणे व भाऊसाहेब महाजन यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पांडुरंग शिंगाणे (नगरसेवक), दीपक शिंगाणे, मोहन भोई, हिरालाल भोई, राजेंद्र शिंगाणे, रवींद्र शिंगाणे, श्रीराम भोई, भीका भोई, संतोष शिंगाणे, पंकज भोई (नगरसेवक), दिनकर भोई, शशिकांत शिंगाणे, मनोज शिंगाणे, सुदाम शिंगाणे, गणेश शिंगाणे, देवा भोई, विजय शिंगाणे, सागर भोई, दीपक ढोले, संदीप शिंगाणे, विकी शिंगाणे व प्रवीण शिंगाणे यांनी विशेष परिश्रम घेतले.
संपूर्ण कार्यक्रम शांतता, उत्साह आणि भक्तीभावाच्या वातावरणात पार पडला. समाजबांधवांनी एकोप्याने सहभाग घेतल्याने जयंती उत्सवाला विशेष रंगत आली असून परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.






















