
जळगाव मिरर | २९ मे २०२६
यावल शहरातील फैजपूर रोडवरील महेंद्र ढाबाचे व्यवस्थापक भरत ज्ञानेश्वर वानखेडे यांनी हॉटेलमध्येच एकटे असताना गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटनासमोर आली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यावल शहरातील फैजपूर मार्गावरील असलेल्या महेंद्र ढाबा आहे. या ढाब्याचे व्यवस्थापक म्हणून शहरातील हरिओम नगरमधील भरत ज्ञानेश्वर वानखेडे (वय २७) हे काम पाहतात. या ढाब्याचे व्यवस्थापक तरूणाने रात्री ढाब्यावर एकटे असताना गळफास घेत आत्महत्या केल्याची दुदैवी घटना घडली आहे. या तरूणाने टोकाचे पाऊल उचलल्यामुळे तरुणांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत महेंद्र रामा जावरे यांनी दिलेल्या माहितीवरुन यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, भरत वानखेडे या तरूणाचे मागील वर्षीच लग्न झालेले आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, २ भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे. तर, या तरुणाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.





















