
जळगाव मिरर | १ जून २०२६
दीड महिन्यांपुर्वी लग्न झालेल्या अक्षय रविंद्र पाटील (वय २४, रा. खेडी, ता. जळगाव) या तरुणाचा रविवार दि. ३१ मे रोजी राहत्या घरात आत्महत्या केली. या तरुणाच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले नसून याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील खेडी येथे अक्षय पाटील हा तरुण वास्तव्यास होता गेल्या महिन्यात दि. ११ एप्रिल रोजी त्याचा विवाह झाला होता. त्यानंतर दि. ३० मे रोजी दीड महिन्यातच अक्षय याने राहत्या घरात स्वतःला संपविल्याची घटना घडली. घरात तो बेशुद्ध अवस्थेत मिळून आल्यामुळे त्याला कुटुंबियांनी तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करीत त्याला मयत घोषीत केले. यावेळी नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयातच प्रचंड आक्रोश केला. घटनेची माहिती मिळताच त्याच्या मित्रांसह नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
मयत अक्षय पाटील याच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान, पैशांसाठी काही जणांकडून त्याच्याकडे तगादा लावित होते, त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून अक्षय हा तणावात होता, त्यातूनच त्याने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याची चर्चा जिल्हा रुग्णालयात सुरु होती. मात्र अद्याप त्याच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे





















