• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ : ४ छापे, ८ ताब्यात, ३३,८४० रुपयांची रोकड जप्त !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 2, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ : ४ छापे, ८ ताब्यात, ३३,८४० रुपयांची रोकड जप्त !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २ जून २०२६ 

जळगाव शहरात छुप्या पद्धतीने सुरु असलेल्या अवैध धंद्यांवर आणि विशेषतः जुगार व मटका अड्ड्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या कडक सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली आणि जळगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने मंगळवारी (२ जून) शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकाच दिवशी तब्बल ४ ठिकाणी धडक छापे टाकले. या धडक कारवाईमुळे शहरातील अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

​या चार वेगवेगळ्या कारवायांमध्ये पोलिसांनी मटका आणि सट्टा खेळवणाऱ्या एकूण ८ संशयितांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून ३३ हजार रुपयांहून अधिक रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असून, सर्व संशयितांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२ (अ) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

​पोलिसांनी केलेल्या या कारवाईचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे आहे:  ​१. गांधी मार्केट परिसरात छापा (जळगाव शहर पोलीस स्टेशन हद्द) ​शहरातील वर्दळीच्या गांधी मार्केट परिसरातील मुतारीच्या भिंतीच्या आडोशाला काही जण कल्याण मटका चालवत असल्याची गुप्त माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार सायंकाळी ६:१५ वाजता पोलिसांनी अचानक छापा टाकला.  ​अटक संशयित: नंदलाल गणपत बुरुजवाले (वय ५६, रा. सातीबाजार, नशिराबाद) आणि अशोक गोपाळ महाजन (वय ४९, रा. जुना आसोदा रोड, जळगाव).  ​जप्त मुद्देमाल: या दोघांकडून पोलिसांनी २,६८०/- रुपये रोख रक्कम, तसेच कल्याण मटका जुगाराच्या आकडे लिहिलेल्या स्लिप, कार्बनचा तुकडा आणि बॉलपेन जप्त केले.

​२. टोल नाक्याजवळ मोठी कारवाई (एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन हद्द) ​सर्वाधिक मोठी कारवाई सुप्रीम कॉलनी समोरील रस्त्याच्या कडेला असलेल्या टपरीच्या आडोशाला करण्यात आली. सायंकाळी ७:०० वाजता टाकलेल्या या छाप्यात चौघांना रंगेहाथ पकडण्यात आले. ​अटक संशयित: रहीम मेहताब तडवी (वय ४३, रा. मध्य प्रदेश), निलेश लक्ष्मण सोनार (वय २८, रा. जळगाव), आशिक शाहा शहादत शाहा (वय ३२, रा. जळगाव) आणि दिपक सोनार (वय ४२, रा. जळगाव). जप्त मुद्देमाल: या अड्ड्यावरून पोलिसांनी सर्वाधिक १५,७४०/- रुपये रोख रक्कम जप्त केली. तसेच ‘वरली मेनबाजार’ सट्टा जुगाराचे साहित्य, कागदी स्लिप आणि कार्बन हस्तगत करण्यात आला.

​३. आझाद नगर टी पॉईंट (रामानंद नगर पोलीस स्टेशन हद्द) ​रामानंद नगर हद्दीतील आझाद नगर टी पॉईंटवर सायंकाळी ६:१० वाजता सार्वजनिक ठिकाणी एका टपरीच्या आडोशाला ‘मिलन डे’ सट्टा खेळवला जात होता. ​अटक संशयित: दिपक राजाराम रणसिंगे (वय ३८). ​जप्त मुद्देमाल: संशयिताकडून ६,९९०/- रुपये रोख रकमेसह सट्ट्याचे आकडे व पैसे लिहिलेल्या पावत्या आणि साहित्य जप्त करण्यात आले.

​४. बॉम्बे रेल्वे गेट परिसर (जिल्हापेठ पोलीस स्टेशन हद्द) – ​दुपारी ४:०० वाजताच्या सुमारास बॉम्बे रेल्वे गेटसमोरील पुलाच्या खाली आडोशाला सुरु असलेल्या ‘मिलन डे ओपन’ सट्टा जुगारावर पोलिसांनी कारवाई केली.  ​अटक संशयित: भरत खेमसिंग गोरखा (वय ३९).  ​जप्त मुद्देमाल: येथून ८,४३०/- रुपये रोख, आकडे लिहिलेले पावती बुक आणि पेन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.  ​एकूण ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

डीवायएसपींच्या पथकाने केलेल्या या दिवसभराच्या मोहिमेत चारही कारवाया मिळून मटका व सट्टा चालवणाऱ्यांकडून एकूण ३३,८४०/- रुपये (तेहतीस हजार आठशे चाळीस रुपये) इतकी रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.
​या पथकाने केली कारवाई

ही धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी  नितीन गणापुरे आणि प्रोबेशनरी DYSP प्रशांत दरेकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या मोहिमेत पोलीस काँस्टेबल सचिन सुरेश साळुंखे यांच्या फिर्यादीवरून गुन्हे दाखल करण्यात आले असून, कारवाईत पो.कॉ. आवेश आरिफ शेख, पो.कॉ. प्रणय सुरेश पवार, पो.कॉ. अमोल अशोक ठाकुर आणि संबंधित पोलीस ठाण्यांच्या अधिकारी व अंमलदारांनी मोलाची भूमिका बजावली. या धडक कारवाईमुळे अवैध व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

Related Posts

जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !
क्राईम

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !
क्राईम

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा
क्राईम

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !
क्राईम

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

छेडखानीच्या त्रासाला कंटाळून तरुणीने संपविले आयुष्य : पाच संशयितांना अटक !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

केबल चोरी प्रकरण : संशयितांना कारागृहातून दोन गुन्ह्यात घेतले ताब्यात

October 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group