
जळगाव मिरर | ३ जून २०२६

येथील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय (GDCH) येथे महाविद्यालयाचे आदरणीय अधिष्ठाता डॉ. जगदीशचंद्र वाथर यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ०३ जून २०२६ रोजी “आकर्षणामागचे सत्य: निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनाचा प्रतिकार” या विषयावर विशेष घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तरुण पिढीला तंबाखू व निकोटीनच्या फसव्या आकर्षणापासून दूर ठेवणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता.
या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने सहभाग घेत आपल्या प्रभावी घोषवाक्यांतून तंबाखूचे दुष्परिणाम मांडले. हा संपूर्ण उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी अत्यंत प्रभावी आणि प्रेरणादायी ठरला.





















