
जळगाव मिरर | ६ जून २०२६

दिनांक 4 ते 6 जून दरम्यान महाराष्ट्र राज्य डॉजबॉल असोसिएशन व बुलढाणा जिल्हा डॉजबॉल असोसिएशन आयोजित 13 व्या राज्यस्तरीय सिनियर गट डॉजबॉल अजिंक्यपद स्पर्धा चिखली येथे संपन्न झाल्या या स्पर्धेत जळगाव जिल्हा संघाने स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले.
जळगाव जिल्हा संघाने ठाणे, पिंपरी चिंचवड, अहिल्यानगर, पुणे, जालना, बीड, या संघांचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली अंतिम सामना रायगड जिल्हा संघासोबत झाला यात जळगाव जिल्हा संघाने 6-4 गुणांनी रायगड संघाचा पराभव करीत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले जळगाव जिल्हा संघात विनायक सपकाळे, मयूर चांडे , संकल्प राजपूत ,पंकज गावंडे, रामेश्वर परिहार, सुमित तायडे, अथर्व पाटील, आदित्य मोरे ,धीरज बारी,आर्यन राजपूत, दिनेश खर्डे, प्रणव पाटील यांचा समावेश होता जळगाव जिल्हा संघ व्यवस्थापक म्हणून सचिन महाजन तर संघ प्रशिक्षक म्हणून गिरीश पाटील हे होते संघास जळगाव जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे कार्याध्यक्ष गिरीश पाटील, जळगाव जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे सचिव योगेश सोनवणे व राष्ट्रीय खेळाडू सुश्मित पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
विजय संघास महाराष्ट्र राज्य डॉजबॉल असोसिएशनचे सचिव शिवछत्रपती पुरस्कार्थी प्राचार्य डॉ. हनुमंत लुंगे यांच्या हस्ते चषक देऊन गौरवण्यात आले याप्रसंगी महाराष्ट्र राज्य डॉजबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा जळगाव जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे अध्यक्ष राजेश जाधव, राज्य तांत्रिक समितीचे अध्यक्ष डॉ.हरीश काळे (अमरावती) गिरीश काळे (अकोला) दिनेश धारपवार (वाशिम) कैलास करवंदे (बुलढाणा) मुकेश पवार (पुणे) गिरीश महाजन (जळगाव) यांची उपस्थिती होती




















