
जळगाव मिरर | ७ जून २०२६

जळगाव तालुक्यातील एका गावात रस्त्याने जात असलेल्या १८ वर्षीय तरुणीला अडवून तिचा हात पकडत विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित युवकाविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील एका गावात राहणारी १८ वर्षीय तरुणी ५ जून रोजी दुपारच्या सुमारास रस्त्याने जात होती. त्यावेळी कानसवाडा येथील रहिवासी असलेला संशयित गोपाळ रविंद्र कोळी याने तिला आवाज देऊन थांबवले. तरुणी थांबताच त्याने तिचा हात पकडून तिचा विनयभंग केला. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे तरुणी घाबरून गेली. तिने घरी पोहोचल्यानंतर घडलेला सर्व प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी तत्काळ नशिराबाद पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.
तरुणीच्या तक्रारीवरून संशयित गोपाळ रविंद्र कोळी याच्याविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक विजय कोळी करीत आहेत.




















