
जळगाव मिरर | ८ जून २०२६

तालुक्यातील नाशिराबाद येथे बकरीची घाण घरात येत असल्याने त्याबाबत बोलण्यासाठी गेलेल्या सुलेका बी मुजाहीद खान (वय ३०, रा. राममंदिराजवळ, नशिराबाद, ता. जळगाव) या महिलेच्या डोक्यात वरच्या मजल्यावरुन झाडाची कुंडी मारुन गंभीर जखमी केले. ही घटना दि. २ जून रोजी घडली. याप्रकरणी पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील नशिराबादमधील राममंदिराजवळ सुलेकाबी मुजाहीद खान या वास्तव्यास आहे. त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या फिरोजखा शेरखान हे वास्तव्यास असून त्यांच्याकडे बकऱ्या आहेत. त्यांची घाण होत असल्याने ती घाण सुलेका बी खान यांच्या घरात जाते. त्यामुळे सुलेका बी खान या फिरोज खान यांना बोलल्या असता त्याचा राग आल्याने मुलगा आबिद खान याने व सासू सलमाबी आबिद खान यांनी शिवीगाळकेली.
यावेळी त्यांचे पती घराबाहेर आले असता, त्यांची देखील कॉलर पकडून धक्काबुक्की केली. त्यानंतर मोहीन खान व फिरोज खान यांनी महिलेचे हात पकडून ठेवले. तर आबीद खान याने वरच्या मजल्यावरुन त्यांच्या डोक्यात झाडाची कुंडी मारुन गंभीर जखमी केले. गंभीर जखमी झालेल्या महिलेला रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून त्यांनी दिलेल्या जबाबादावरुन संशयित फिरोज खान शेर खान, आबीद खान, मोहीन खान व उमर खान रा. रामंदिराजवळ नशिराबाद, ता. जळगाव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ अतुल महाजन हे करीत आहे.




















