
जगळव मिरर | २१ जून २०२६

२१ जून हा दिवस संपूर्ण जगभरात योग दिवस म्हणून साजरा केला जातो. दिनाच्या अनुषंगाने भारतीय जीवन शैलीतील किंवा भारतीय ज्ञान परंपरेतील महत्त्व संपूर्ण जगाला परिचित करून दिला जाते. संपूर्ण जगाला या भारतीय ज्ञानाला आत्मसात केले असून हे आपल्या सर्वांसाठी गर्वाची काम आहे.याच दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयात योग दिवस साजरा करण्यात आला यासाठी योग साधना प्राणायाम यांचे प्रशिक्षण देण्याकरिता सौ. स्मिता बुरकूल यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी एवढे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश एच बारी, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. हर्षा खडके यांची देखील उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून करण्यात आली. आपल्या प्रमुख मार्गदर्शनात त्यांनी योग साधना व प्राणायाम यांना आत्मसात करणे आजच्या आधुनिक काळात किती महत्त्वाचे आहेत हे पटवून दिले तसेच विविध आसनांचा व प्राणायम यांचा सराव करण्यात आला.
महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी योग दिवस साजरा करण्याचा इतिहास व या वर्षाची थीम निरोगी वृद्धत्वासाठी योग Yoga for Healthy Ageing या बद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. हितेंद्र सरोदे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. संतोष बडगुजर यांनी विशेष प्रयत्न केले तर कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली.





















