
नंदकिशोर महाजन यांचा विजय ऐतिहासिक

जळगाव मिरर | २२ जून २०२६
रावेर विधानसभा मतदारसंघातून तांदलवाडी येथील राजाराम महाजन यांना त्यांच्या गावातून पहिल्यांदा आमदार होण्याची संधी मिळाली होती. आता स्थानिक स्वराज्य मतदार संघातून या गावातील नागरिक नंदकिशोर महाजन यांच्या रूपाने दुसऱ्यांदा आमदारपद मिळाल्या असून गावात मोठा जल्लोष पाहायला मिळत आहे.
रावेर तालुक्यातील तांदलवाडी येथील राजाराम गणू महाजन हे सर्वात आधी सरपंच, मग पंचायत समिती सदस्य, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद उपाध्यक्ष यानंतर त्यांना आमदार होण्याची संधी मिळाली होती. त्याचप्रमाणे भाजपचे निष्ठवंत नंदकिशोर महाजन यांना देखील पंचायत समिती सदस्य, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद उपाध्यक्ष, जिल्हा बँक संचालक तसेच भाजपा पक्षाने त्यांच्यावर भाजपा रावेर लोकसभा मतदार संघाची प्रमुख जबाबदारी दिली आहे. आता त्यांना भाजप पक्षाने विधान परिषदेच्या माध्यमातून संधी दिली होती. त्यात ते आता विजयी झाले आहे.
तांदलवाडी गावाला आता दुसऱ्यांदा आमदार होण्याची संधी मिळाली आहे. त्याचप्रमाणे रावेर तालुक्याला दुसऱ्यांदा विधान परिषद सदस्य म्हणजेच आमदार होण्याची संधी प्राप्त झाली आहे. याआधी १९७८ ते ८४ या दरम्यान रावेर तालुक्यातील बलवाडी येथील स्व. बाजीराव नाना पाटील यांना संधी मिळून विधान परिषदेवरती आमदार झाले होते. यानंतर ४२ वर्षांनंतर पुन्हा रावेर तालुक्याला विधान परिषदेचे आमदार होण्याची संधी नंदकिशोर महाजन यांच्या माध्यमातून मिळाली आहे.




















