• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी; महापौर दीपमाला काळे यांनी नागरिकांशी साधला संवाद

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 24, 2026
in जळगाव, क्राईम, जळगाव ग्रामीण
0
नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी; महापौर दीपमाला काळे यांनी नागरिकांशी साधला संवाद
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २४ जून २०२६ 

पावसाळा तोंडावर आलेला असताना, शहरातील नालेसफाई आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे यांनी शनिवारी चांगलीच कानउघडणी केली. शनिवार (दि. २०) रोजी सकाळीच महापौरांनी शहरातील विविध भागांत प्रत्यक्ष जागेवर जाऊन नालेसफाईची पाहणी केली व नागरिकांच्या तक्रारी जाणून घेतल्या. यावेळी टाऊन प्लॅनिंगच्या अधिकाऱ्यांना त्यांनी सोमवारी तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

संभाजीनगर व रविराज कॉलनीतील नाल्यांवर अतिक्रमणे
दौऱ्याच्या सुरुवातीला महापौर दीपमाला काळे यांनी संभाजीनगर चौक, विवेक कॉलनी आणि रविराज कॉलनी परिसराची पाहणी केली. येथे वायरिंगचे जाळे आणि नाल्यांची स्थिती अत्यंत बिकट असल्याचे दिसून आले. काही नाल्यांवर थेट घरे बांधली गेल्याचे समोर आले. पावसाळ्यात पाणी वाढल्यास येथे गंभीर समस्या निर्माण होऊ शकते, अशी माहिती मुख्य स्वच्छता निरीक्षक रमेश कांबळे यांनी महापौरांना दिली. महापौरांनी स्वतः नाल्यांजवळ जाऊन स्थानिक नागरिकांशी संवाद साधला व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

नागरिकांच्या तक्रारी; कामांचा घेतला आढावा
यानंतर महापौरांनी रामानंदनगर परिसरातील विवेकानंद नगर आणि शिवनेरी सांस्कृतिक मंडळ परिसराची पाहणी केली. स्थानिक नागरिक प्रशांत पाटील व नागरिकांनी तक्रार केली की, “पावसाचे पाणी नाल्यातून थेट घरांमध्ये, अंगणात आणि कंपाऊंडमध्ये शिरते, ज्यामुळे मोठी घाण पसरते.” या समस्येवर तातडीने तोडगा काढण्यासाठी सोमवारपर्यंत माहिती सादर करण्याचे कडक निर्देश टाऊन प्लॅनिंग विभागाला दिले.

महापौरांच्या या तत्परतेमुळे भारावून जाऊन रामानंदनगरमधील नागरिकांनी त्यांचे ‘केवळ आश्वासन देणारे नव्हे, तर प्रत्यक्ष जागेवर येऊन काम करणारे पहिलेच महापौर पाहिले’ या शब्दात आभार मानले. यानंतर रामानंदनगर घाटातील शेवटी असलेल्या नाल्यात सुरू असलेल्या नालेसफाईचे काम पाहून महापौरांनी सफाई कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. तसेच लवकरात लवकर कामे पूर्ण करा असे सांगितले.

पिंप्राळ्यात दुर्घटनाग्रस्त नाल्याची पाहणी
प्रभाग क्रमांक ११ मधील खंडेराव नगर येथील रेल्वे पुलाजवळील नाल्याचीही महापौरांनी पाहणी केली. येथे पावसाळ्यात पाणी साचून आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. यावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी अधिकाऱ्यांची विशेष बैठक बोलावण्यात आली आहे. तसेच, प्रभाग क्रमांक १० मधील पिंप्राळा येथील वटुकेश्वर महादेव मंदिराजवळील नाल्याची पाहणी करण्यात आली. या नाल्यात भूतकाळात काही नागरिक व गुरेढोरे वाहून गेल्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. त्यामुळे येथील समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी नगररचना विभागाला विशेष निर्देश देण्यात आले. या पाहणी वेळी नगरसेवक सुरेश सोनवणे, अतुल बारी, सागर पाटील आणि महापालिका अधिकारी अतुल पाटील उपस्थित होते.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापौरांचे कडक निर्देश
शहरात कधीही मुसळधार पाऊस सुरू होण्याची शक्यता लक्षात घेता, महापौर दीपमाला काळे यांनी आपत्ती व्यवस्थापन आणि आरोग्य विभागाला हायअलर्टवर राहण्याचे आदेश दिले आहेत. शनिवारच्या सुट्टीच्या दिवशीही महापौरांनी स्वतः मैदानात उतरून केलेल्या या पाहणी दौऱ्यामुळे जळगावकर नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Related Posts

अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला !
क्राईम

अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला !

June 24, 2026
आईच्या डोळ्यांसमोर काळाचा घाला; शेतात वीज कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
क्राईम

आईच्या डोळ्यांसमोर काळाचा घाला; शेतात वीज कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

June 24, 2026
‘ग्रीन सिटी’साठी जळगाव मनपाची मोठी पावले : महापौर, आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक
जळगाव

‘ग्रीन सिटी’साठी जळगाव मनपाची मोठी पावले : महापौर, आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक

June 24, 2026
गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला; बँक सिस्टीमच्या अलर्टमुळे चोरटे पसार
क्राईम

गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला; बँक सिस्टीमच्या अलर्टमुळे चोरटे पसार

June 24, 2026
वाघूरमध्ये ६२ टक्के पाणीसाठा; जलसंकट टाळण्यासाठी उपमहापौरांचा ‘वॉटर सेव्हिंग’ मंत्र
जळगाव

वाघूरमध्ये ६२ टक्के पाणीसाठा; जलसंकट टाळण्यासाठी उपमहापौरांचा ‘वॉटर सेव्हिंग’ मंत्र

June 23, 2026
जळगावात रक्तबंबाळ अवस्थेतील तरुणाचा रस्त्याच्याकडेला मृतदेह; घातपाताचा संशय फोल !
क्राईम

जळगावात रक्तबंबाळ अवस्थेतील तरुणाचा रस्त्याच्याकडेला मृतदेह; घातपाताचा संशय फोल !

June 23, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी; महापौर दीपमाला काळे यांनी नागरिकांशी साधला संवाद

नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी; महापौर दीपमाला काळे यांनी नागरिकांशी साधला संवाद

June 24, 2026
अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला !

अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला !

June 24, 2026
आईच्या डोळ्यांसमोर काळाचा घाला; शेतात वीज कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

आईच्या डोळ्यांसमोर काळाचा घाला; शेतात वीज कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

June 24, 2026
‘ग्रीन सिटी’साठी जळगाव मनपाची मोठी पावले : महापौर, आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक

‘ग्रीन सिटी’साठी जळगाव मनपाची मोठी पावले : महापौर, आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक

June 24, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group