
जळगाव मिरर | २६ जून २०२६

चोपडा तालुक्यातील करणाऱ्या २८ वर्षीय नराधम सलमान खान अख्तर खान (रा. हमीद नगर, चोपडा) याला अमळनेर न्यायालयाने दोषी ठरवित, त्याला पाच वर्ष सश्रम कारावास आणि साडेपाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि. १२ ऑगस्ट २०२४ रोजी फिर्यादी महिलेचा पती हे बांधकाम साईवर कामासाठी गेले होते. त्याची दोन्ही मुली घरी असतांना दुपारच्या सुमारास संशयित सलमान शेख हा त्यांच्या घरी गेला. त्याने तुमची मुले घरी रडत असून माझ्यासोबत चला असे म्हणत त्यांना घरी नेले. यावेळी त्यांची मोठी मुलगी ही घराबाहेर रडत असतांना तीच्या आईने विचारपूस केली असता, तीने खेळून झाल्यानंतर घरात गेली. त्यावेळी बांधकामाच्या साईटवर काम करणाऱ्या सलमान शेख हा त्यांच्या घराजवळ आला. त्याने पीडितेला घरातनू बाहेर आणले आणि तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या खटल्याचे कामकाज जिल्हा न्यायाधीश व अतिरीक्त सत्र न्यायाधीश सी. व्ही. पाटील यांच्या न्यायालयात चालले. यावेळी सरकारी वकील अॅड. के. आर. बागुल, मंगरूळकर यांनी एकूण सात साक्षीदार तपासले. यात फिर्यादी, पीडित मुलगी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, घरमालक व वैद्यकीय अधिकारी डॉ. सपना पाटील यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. या घटनेचा तपास तपास अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे व शहर पोलीस ठाण्याचे पोनि पवन देसले यांनी केला होता. सर्व साक्षीदारांच्या साक्षी एकमेकांशी सुसंगत असल्याचा पुरावा न्यायालयात सादर झाल्यानंतर न्यायालयाने संशयित सलमान खान अख्तर खान याला दोषी ठरविले.
पॉक्सो कायदा कलम १०, बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम, २०१२ नुसार ५ वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड, भारतीय न्याय संहिता कलम ३३२ (क), ६ महिने साधी शिक्षा व ५०० रुपये दंड व एकूण दंडाची रक्कम न भरल्यास ६ महिने अतिरिक्त साधी शिक्षा भोगावी लागेल, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे. पैरवी अधिकारी म्हणून पी.एस.आय. उदयसिंग साळुके, पो.हे.कॉ. प्रमोद पाटील, पो.हे. कॉ. पुरुषोत्तम वाळके, पो.कॉ. राहुल रणधीर, पो.कॉ. सतीश भोई, पो.कॉ. भरत इशी यांनी मदत केली.




















