
जळगाव मिरर | १ जुलै २०२६

फैजपूर शहरातील एका भागात राहणाऱ्या ७० वर्षीय वयोवृद्ध महिलेवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी तपासचक्रे फिरवित संशयित रवी चव्हाण (वय ४०) याला दोन तासात अटक करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला आपल्या राहत्या घरी एकट्या असताना आरोपी रवी चव्हाण (वय ४०) हा दि. २९ जून रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास तेथे आला. त्याने पिण्यासाठी पाणी मागितले. महिला पाणी देत असताना आरोपीने तिचा हात पकडून तिला जीवे मारण्याची धमकी दिली.
‘गप्प बस, नाहीतर खल्लास करून टाकीन,’ अशी धमकी देत संशयित आरोपीने तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. पीडित महिलेने दि. ३० जून रोजी फैजपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संशयित रवी चव्हाण याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर, पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दीन सय्यद करीत आहेत




















